आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फसलेले कनेक्टींगः बाजारपेठेची नाळ न ओळखल्‍यामुळे झाली नोकिया-ब्‍लॅकबेरीची अधोगती

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

स्‍मार्टफोन्‍सच्‍या विश्‍वात दोन मोठ्या घडल्‍या. पहिली घटना म्‍हणजे, नोकियाच्‍या हॅण्‍डसेट विभागाला मायक्रोसॉफ्टने अधिगृहीत केले. तर, दुसरी घटना म्‍हणजे, ब्‍लॅकबेरीचा ताबा भारतीय वंशाचे प्रेम वत्स घेणार आहेत. वत्स मूळ हैदराबादचे रहिवासी असून सध्या त्यांचे कॅनडात वास्तव्य आहे. फेअरफॅक्स फायनान्शियल होल्डिंगचे संस्थापक चेअरमन आणि सीईओ असलेले वत्स कॅनडाचे वॉरन बफेट मानले जातात. दोन्‍ही कंपन्‍या एकेकाळी मोबाईल विक्रीत आघाडीवर होत्‍या. नोकियाचा बाजारपेठेत सर्वाधिक वाटा होता. तर ब्‍लॅकबेरी स्‍मार्टफोनच्‍या क्षेत्रात आघाडीवर होती. ब्‍लॅकबेरी वापरणारा एक विशिष्‍ठ वर्ग होता. काही सेवा बिझनेस क्‍लाससाठी अतिशय उपयुक्त असल्‍यामुळे अल्‍पावधीतच ब्‍लॅकबेरीने झेप घेतली. मात्र, गेल्‍या 3 वर्षांमध्‍ये मोबाईल बाजारपेठेचे चित्र बदलले. स्‍मार्टफोन क्षेत्रात अनेक कंपन्‍या उतरल्‍या. रोज नवे तंत्रज्ञान येऊ लागले. त्‍यामुळे लवकरच किंमतींमध्‍येही झपाट्याने घसरण झाली. या बदलत्‍या स्‍पर्धेत दोन्‍ही कंपन्‍यांना बाजारपेठेची नाळ ओळखता आली नाही. म्‍हणूनच ही वेळ आली.

अनेक कारणांमुळे नोकिया आणि ब्‍लॅकबेरीची घसरण झाली... या कारणांचा थोडक्‍यात आढावा घेऊ या... पुढील स्‍लाईड्सवर क्लिक करा आणि जाणून घ्‍या दोन्‍ही कंपन्‍यांच्‍या घसरणीमागील कारणे...