Home | Business | Auto | strike effect on maruti car production

संपामुळे ‘मारुती’च्या उत्पादनावर परिणाम

Agency | Update - Jun 07, 2011, 09:36 AM IST

कामगार आणि व्यस्थापनात खटके उडाले आणि कामगारांनी संपाचे हत्यार उपसले

  • strike effect on maruti car production

    नवी दिल्ली - तिस-या दिवशीही कामगारांचा संप सुरूच राहिल्याने ‘मारुती सुझुकी इंडिया’ या कंपनीच्या मानेसर येथील कारखान्यातील कामकाज ठप्प झाल्याने मोठे नुकसान होत असल्याचे कंपनीने म्हटले आहे.

    कामगारांची युनियन स्थापण्यावरून हा संप शनिवारपासून सुरू झाला. सुमारे २००० कामगार यात सहभागी झाले आहेत. मानेसर येथील कामगारांची स्वतंत्र युनियनची मागणी आहे. कामगारांचे म्हणणे आहे की, सध्या कंपनीत ‘मारुती सुझुकी कामगार युनियन’ अशी एकच युनियन आहे. या युनियनचे काम गुरगावातून चालते. मानेसर येथील कारखान्यातील काम गुरगावपेक्षा वेगळे आहे. येथील कामगारांच्या समस्याही निराळ्या आहेत. त्यामुळे आम्ही येथे ‘मारुती सुझुकी एम्प्लॉईज युनियन’ स्थापन केली. व्यवस्थापनाचा या नव्या युनियनला विरोध आहे. जुन्या युनियनबाबत आम्ही समाधानी असल्याचे व्यवस्थापनाने कामगारांकडून सक्तीने लेखी घेतले.

    त्यातून कामगार आणि व्यस्थापनात खटके उडाले आणि कामगारांनी संपाचे हत्यार उपसले. यापूर्वीही नोव्हेंबर २००० मध्ये मानेसर येथील संप तीन महिने चालला होता. तीन दिवसांनंतरही परिस्थितीत काहीच फरक पडला नसल्याचे कंपनीच्या प्रवक्त्याने सांगितले.

Trending