आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'बजाज'च्या नव्या बाइकमध्ये स्टाइल, मायलेजचा उत्तम मेळ

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे - बजाज ऑटोने बजाज डिस्कव्हर १५० एफ (हाफ फेअरिंग) आणि डिस्कव्हर १५० एस (स्टँडर्ड फेअरिंग) या दोन मोटारसायकल नुकत्याच सादर केल्या. खिशाला परवडणारी आणि बाइकस्वारीचा आनंद देणारे अनोखे मिश्रण यात आहे. सध्याच्या ग्राहकांच्या गरजा आणि कल लक्षात घेऊन या बाइक तयार करण्यात आल्या असल्याचे बजाजने म्हटले आहे.

नवी हाफ फेअरिंग डिस्कव्हर १५० एफ मोटारसायकलमध्ये स्टाइल आणि परफॉर्मन्स या दोन्ही आघाड्यांवर ग्राहकांच्या पसंतीस उतरणारी आहे. जास्त शक्ती आणि उत्तम मायलेजच्या बाबतीत या श्रेणीतील इतर बाइकपेक्षा नव्या डिस्कव्हर मोटारसायकल उजव्या असल्याचा दावा बजाज ऑटोने केला आहे.

फीचर्स
- डीटीएस - आय इंजिन : ४ व्हॉल्व्ह १४५ सीसी, १४.५ पीएस, ७२ किलोमीटर / लिटर मायलेज,
- मोनो शॉक नायट्रॉक्स सस्पेन्शन : आरामदायी प्रवासासाठी
- पेटल डिस्क ब्रेक : खात्रीशीर ब्रेकिंग
- डिजिटल मीटर
- रुंद ट्यूबलेस टायर्स - रस्त्याची मजबूत पकड व सुरक्षित
- डीसी लायटिंग : कमी वेग असतानाही चांगला प्रकाश.
किंमत
डिस्कव्हर १५० एफ : ५८,७३९ रुपये
डिस्कव्हर १५० एस (ड्रम): ५१,७२० रुपये
डिस्कव्हर १५० एस (डिस्क) : ५४,७२५ रुपये
(सर्व किमती एक्स-शोरूम, पुणे)