आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सहाराच्या सुब्रतो रॉय यांनी केले सेबीवर आरोप

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- गुंतवणूकदरांची 24,000 कोटींपेक्षा जास्त रक्कम परत करण्याच्या प्रकरणात सहारा समूहाचे सर्वेसर्वा सुब्रतो रॉय बुधवारी सेबी कार्यालयात हजर झाले. त्यांच्यासमवेत सहाराचे तीन संचालकही होते. सेबीचे अधिकारी आणि सहारा यांच्यात रॉय यांच्याकडून जमा करण्यात आलेल्या कागदपत्रांची शहानिशा करण्यात आली. सेबीच्या कार्यालयातून बाहेर आल्यानंतर सुब्रतो रॉय यांनी सेबीवरच आरोप केले. सेबीनेच गुंतवणूकदारांची रक्कम परत करावी, असे रॉय म्हणाले.

तीन कोटींहून जास्त गुंतवणूकदारांची 24,000 कोटी रुपयांहून अधिक रक्कम परत करण्याविषयीच्या या प्रकरणात सेबीने बुधवारी सुब्रतो रॉय आणि सहाराच्या तीन संचालकांना चौकशीसाठी बोलावले होते. गुंतवणूकदारांची रक्कम परत करण्यासाठी या सर्वांच्या व्यक्तिगत संपत्तीचा लिलाव करण्याच्या दृष्टीने एक पाऊल म्हणून ही चौकशी करण्यात आली. सेबीने 26 मार्च रोजी रॉय व तीन संचालकांनी चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश दिले होते. याप्रकरणी सहारा समूहाने विविध वृत्तपत्रे तसेच इतर माध्यमातून जाहिरातीद्वारे सेबी आणि सेबीच्या उच्चपदस्थांवर आरोप केले होते. सेबीने सहाराचे प्रमुख सुब्रतो रॉय व इतरांना त्यांची बाजू मांडण्याची संधी दिली नसल्याचे आरोप जाहिरातीतून करण्यात आले होते.

सेबीने चहादेखील पाजला नाही

रॉय म्हणाले, सेबीकडून झालेल्या चौकशीत संपत्तीबाबत विचारणा झाली. माझ्या संपत्तीविषयी ऐकून सेबीचे अधिकारी घाबरून गेले. सेबीने साधा चहादेखील पाजला नाही, असा आरोपही त्यांनी केला.