आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सेझमधील वस्तू शुल्क सवलतीत लवकरच बदल करणार

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - स्थानिक पातळीवर विक्री करण्यात आलेल्या विशेष आर्थिक विभागातील (सेझ) वस्तूंसाठी असलेल्या शुल्क सवलतीत बदल करण्याचा विचार वाणिज्य मंत्रालयाने केलेला आहे. या शुल्क सवलतीबाबत निर्माण झालेली संभ्रमावस्था दूर करून महसुली तोट्यातील गळती थांबवणे असा यामागे उद्देश आहे.
सेझमधील वस्तू विक्रीबाबत देण्यात येणा-या सवलत नियमाचा चुकीचा अर्थ लावल्यामुळे मुंबईतल्या विशेष आर्थिक भागातील वस्तूंची चार टक्के विशेष अतिरिक्त शुल्क न भरता स्थानिक बाजारपेठेत विक्री करण्यात आल्याची घटना घडली. त्या पार्श्वभूमीवर वाणिज्य मंत्रालयाने हा विचार केल्याचे सीमाशुल्क विभागाच्या सूत्रांनी सांगितले. केंद्रीय अबकारी आणि सीमाशुल्क मंडळाकडून बजावण्यात आलेल्या नोटिशीनंतर हा सर्व प्रकार घडल्याने त्यात तातडीने सुधारणा करावी, असे या अधिका-याने सांगितले.