आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Success Story Of Harley Davidson Bike News In Marathi

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

\'World War\'मध्ये दिसली होती ही Bike; वाचा Harley Davidsonचा रोचक प्रवास

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- Harley Davidson च्या बाइक्स आजही लोकप्रिय आहेत. युवकच नव्हे तर सैन्यातील जवानांची देखील या बाइक्स पहिली आवड ठरली आहे. World War दरम्यान Harley Davidson बाइक्सची विक्री वाढली होती. World War ला पूर्णविराम मिळाल्यानंतर Harley Davidson बाइक्सवर स्वार होऊन अमेरिकन सैन्याने जर्मनीत प्रवेश केला होता.
Harley Davidson कंपनी 113 वर्षे जुनी असून विलियम एस. हार्ले आणि आर्थर डेव्हिडसन हे या कंपनीचे संस्थापक आहे. त्यामुळे दोघांच्या नावावरुन 'हार्ले डेव्हिडसन' असे कंपनीचे नाव ठेवण्यात आले होते.
सन 1901 मध्ये मिलवॉकी, विस्कॉन्सिनमध्ये 21 वर्षीय विलियम एस. हार्ले यांनी चार इंचाचे फ्लाय व्हीलसोबत 116 सीसीचे एक लहान इंजिन तयार केले होते. पेडल सायकलमध्ये बसवण्यासाठी या इंजिनची निर्मिती करण्‍यात आली होती. यासाठी हार्ले यांनी सलग दोन वर्षे परिश्रम घेतले. या कामात हार्ले यांना त्यांचे मित्र आर्थर डेव्हिडसन आणि त्याचा भाऊन वॉल्टर डेव्हिडसन यांची मदत घेतली.
सन 1903 मध्ये हार्ले आणि डेव्हिडसनची 'पॉवर सायकल' रस्त्यावर धावली. मात्र, मिलवॉकीमधील डोंगराळ भागत ती धावू शकत नसल्याचे त्यांच्या लक्षात आले. तरी देखील हार्ले यांनी आपली जिद्द सोडली नाही. 9.5 इंचाचे फ्लाय व्हील्स आणि 405 सीसीच्या इंजिनवर काम सुरु केले. हार्ले व डेव्हिडसन यांनी घरामागील 150 वर्गफूट जागेत आले छोटेसे वर्कशॉप सुरु केले होते आणि यात दोघे यशस्वी झाले. मिलवॉकीच्या खडतर रस्त्यावरही पॉवर सायकल सुसाट वेगाने धावली. डोंगरही चढू लागली. नंतर हार्ले आणि डेव्हिडसन यांनी पॉवर सायकलची निर्मिती सुरु केली. शिकागोमधील कार्ल एस. बेग यांनी हार्ले डेव्हिडसनच्या तीन बाइक्स विक्री केल्या. नंतर हार्ले डेव्हिडसनने कार्ल एस. बेगला डीलर म्हणून नियुक्त केले.

सन 1905 मध्ये हार्ले आणि डेव्हिडसनने 'जुनौ एव्हेन्यू'मधील चेस्टनट स्ट्रीटवर 2400 वर्गफूट जागेवर मॅन्युफॅक्चरिंग युनिट सुरु केले. (याच जागेवर आज हार्ले डेव्हिडसन चे सहा मजली भव्य मुख्यालय आहे.) पहिल्या वर्षी 50 बाइक्सची निर्मिती झाली. याच वर्षात जगातील महिली दुचाकी 'कॅटलॉग' बाजारात दाखल झाली होती.
पहिल्या महायुद्धात मिळाली संधी...
'हार्ले डेव्हिडसन'च्या बाइक्सचा वापर पहिल्या महायुद्धात करण्यात आला. 1917 मध्ये अमेरिकेने महायुद्धात उडी घेतली. अमेरिकन सरकारने 'हार्ले डेव्हिडसन'च्या बाइक्स खरेदी केल्या. युद्धविरामनंतर 'हार्ले बाइक'वर स्वार झालेले अमेरिकेच्या जवानांनी जर्मनीत प्रवेश केला होता. 1920 पर्यंत तर 'हार्ले बाइक' जगातील 67 देशांत पोहोचली होती. अल्पावधीत 'हार्ले' जगातील सगळ्यात मोठा बाइक ब्रँड बनला. 1941 ते 45 या चार वर्षांत अमेरिकन सैन्यासाठी 90 हजार बाइक्सची निर्मिती केली.
पुढील स्लाइड्‍सवर क्लिक करुन वाचा, पोलिस आणि सैनिकांची पहिली पसंत...
(टीप- Harley D‍avidson बाइकचे छायाचित्रे सादरीकरणासाठी वापरण्यात आले आहेत.)