आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Sudhir Mungantiwar Seeks Suggestions For State Budget

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

राज्य अर्थसंकल्पासाठी सरकारने मागवली मते

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - निधीची चणचण आणि गुंतवणुकीतील वाढ साधण्यासाठी राज्य सरकारने आगामी अर्थसंकल्पाबाबत राज्यातील उद्योग संघटना, अर्थतज्ज्ञ, नोकरदार व इतर भागीदारांकडून मते, सूचना मागवल्या आहेत. विशेष म्हणजे राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी इतर राज्यांनाही यासंदर्भात पत्र पाठवून त्यांच्याकडील नवीन योजना कळवण्याचे आवाहन केले आहे.

राज्यातील औद्योगिकीकरणाला चालना मिळावी यासाठी सरकारने पावले टाकण्यास सुरुवात केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून अर्थसंकल्पापूर्वी मते, सूचना मागवण्यात आल्या आहेत. सामान्य प्रशासनाच्या अधिकार्‍याने सांगितले, मुनगंटीवार यांच्या कार्यालयाने विविध राज्यांकडूनही मते मागवली आहेत. त्या राज्यांनी काही विशेष योजना राबवली आहे का, त्यांच्या काही नव्या संकल्पना आहेत का, नागरिक, उद्योजकांना त्या कितपत उपयुक्त आहेत, याबाबतची विचारणा या पत्रात करण्यात आली आहे.

अर्थमंत्र्यांनी फिक्की, मसिआ आणि इतर उद्योग संघटना, अर्थ व नियोजनाशी संबंधित संस्था, अर्थतज्ज्ञ यांनाही मते, सूचना, कल्पना पाठवण्याचे आवाहन केले आहे. विविध खात्यांच्या सचिवांकडूनही मते मागवण्यात आली आहेत. राज्याला कर्जाच्या विळख्यातून सोडवण्यासाठी अर्थमंत्र्यांचे प्रयत्न सुरू असल्याचे या अधिकार्‍याने स्पष्ट केले.

राज्यावर तीन लाख कोटींचे कर्ज
अर्थमंत्र्यांच्या कार्यालयातून पाठवण्यात आलेल्या पत्रात राज्यावर सध्या ३,००,४७७ कोटी रुपयांचे कर्ज असल्याचा उल्लेख आहे. वर्षाकाठी त्यावर २३,८०५ कोटी रुपयांचे व्याज द्यावे लागते, असेही पत्रात म्हटले आहे.