आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

साखर उत्पादनात यंदा घट, महाराष्ट्रातील उत्पादनात 8 टक्के घसरण

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - चालू गळीत हंगामातील पहिल्या सात महिन्यांत देशातील साखर उत्पादनात 3.45 टक्के घट आली आहे. इंडियन शुगर मिल्स असोसिएशनतर्फे (इस्मा) मंगळवारी ही आकडेवारी जाहीर करण्यात आली. चालू गळीत हंगामातील (2013-14) पहिल्या सात महिन्यांत 23.75 दशलक्ष टन साखर उत्पादन झाले आहे. मागील हंगामाच्या तुलनेत साखरेचे उत्पादन घटले आहे.
इस्माने सांगितले, यंदा कारखानदारांची थकबाकी वाढून ती 12 हजार कोटीपर्यंत पोहोचली आहे. साखरेच्या घटत्या किमती आणि कच्च्या साखरेच्या निर्यातीबाबत सरकारचे विलंबाचे धोरण यामुळे थकबाकीत वाढ झाली आहे.

देशात ऑक्टोबर ते सप्टेंबर असा गळीताचा हंगाम असतो. चालू हंगामात एप्रिलअखेर कारखान्यांतून 23.75 दशलक्ष टन साखरेचे उत्पादन झाले आहे. मागील हंगामात याच काळात 24.6 दशलक्ष साखरेचे उत्पादन झाले होते.
आता देशातील गळीत हंगाम संपत आला असून 30 एप्रिलअखेर देशातील 504 पैकी 80 साखर कारखाने सुरू आहेत. मागील वर्षी देशात 25.1 दशलक्ष टन साखरेचे उत्पादन झाले होते. यंदा 23.8 दशलक्ष टन उत्पादन होईल, असा अंदाज इस्माने वर्तवला आहे.