आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

साखरेच्या किमती गडगडल्या, चार वर्षांचा नीचांक गाठला

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - देशातील बाजारात साखरेच्या किमती साडेचार वर्षांच्या नीचांकापर्यंत गडगडल्या आहेत. महाराष्ट्रात एस-३० प्रकारच्या साखरेच्या किमती क्विंटलमागे २,३५० रुपयांवर आल्या आहेत. ऑगस्ट २०१० नंतर साखरेच्या किमतीचा हा सर्वात खालचा स्तर आहे. साखर कारखान्यावर शेतक-यांची थकबाकी देण्याच्या दबावामुळे ही घसरण झाली आहे. रोख रकमेची चणचण असणा-या कारखान्यांना पैशासाठी खुल्या बाजारात मोठ्या प्रमाणात साखर आणली. त्यामुळे किमती गडगडल्या. यंदा मागणीपेक्षा जास्त साखर उत्पादन होण्याचा अंदाज आहे. त्यामुळेही किमतीवर दबाव आहे.

साखर उद्योगातील संघटना इस्माच्या मते, साखर कारखान्यांवर शेतक-यांची ११ हजार कोटींहून जास्त थकबाकी आहे. अशात सरकारने कारखानदारांना दिलासा देण्यासाठी साखर निर्यातीवरील अनुदानाची घोषणा लवकर केली नाही तर साखरेच्या किमती आणखी घसरण्याची शक्यता आहे. सध्या देशभरात ५०० साखर कारखाने सुरू आहेत. त्यापैकी १७१ कारखाने महाराष्ट्रातील असून त्यातील ९९ सहकारी आहेत. विशेष म्हणजे, भारत हा जगातील दुस-या क्रमांकाचा सर्वात मोठा साखर उत्पादक आहे. विपणन हंगाम २०१३-१४ या काळात देशात २४४ लाख साखरेचे उत्पादन झाले होते. त्यापैकी २१.१ लाख टन साखरेची निर्यात करण्यात आली.

पुढे वाचा.. निर्यात अनुदानावरील निर्णय विचाराधीन