आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Sugar Production News In Marathi, Indian Sugar Mill Association, Divya Marathi

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

यंदा साखरेचे विक्रमी उत्पादन होणार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - यंदा कमी झालेला पाऊस आणि मागील वर्षापेक्षा यंदा ऊस लागवड कमी होऊनदेखील देशात साखरेचे सलग पाचव्या वर्षात विक्रमी उत्पादन होण्याची शक्यता इंडियन शुगर मिल असोसिएशनतर्फे (इस्मा) वर्तवण्यात आली आहे .चालू महिन्यात उपग्रहांद्वारे मिळालेल्या छायाचित्रांनुसार, यंदा देशातील ५२.९४ लाख हेक्टर क्षेत्रफळात उसाची लागवड करण्यात आली आहे. हे प्रमाण गेल्या वर्षीपेक्षा फक्त एक टक्क्याने कमी असल्याचे देशातील साखर उत्पादकांचे प्रतिनिधित्व करणा-या ‘इस्मा’ने जाहीर केलेल्या आकडेवारीमध्ये म्हटले आहे.

अस्थिर मान्सून आणि सध्या त्याच्या परिणामांसंदर्भात अंदाज वर्तवणे कठीण असले, तरी साखर उत्पादनाच्या पहिल्या अंदाजानुसार यंदा २५० ते २५५ लाख टन साखरेचे उत्पादन घेतले जाण्याची शक्यता आहे. पुढील महिन्यात मान्सूनचा प्रभाव पूर्णपणे कमी झाल्यानंतर या अंदाजाचा इस्मातर्फे फेरआढावा घेण्यात येणार असल्याचेदेखील या वेळी
सांगण्यात आले.