आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

साखर उत्पादन यंदा घटणार - ‘इस्मा’ने वर्तवला अंदाज

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


मुंबई - गेल्या वर्षीच्या ऑक्टोबर महिन्यापासून सुरू झालेल्या साखर हंगामाच्या पहिल्या पाच महिन्यांत (ऑक्टो- फेब्रु) देशामध्ये 18.8 दशलक्ष टन साखरेचे उत्पादन झाले आहे, परंतु अगोदरच्या वर्षाच्या तुलनेत साखर
उत्पादनात 60 हजार टनांनी घट झाली आहे.

चालू वर्षात एकूण 24.3 दशलक्ष टन साखर उत्पादन होण्याचा अंदाज ‘इंडियन शुगर मिल्स असोसिएशन’ (इस्मा) या संस्थेने व्यक्त केला आहे. महाराष्‍ट्रामध्ये गेल्या वर्षीच्या तुलनेत साखर उत्पादनात काहीशी वाढ झाली आहे, परंतु अवकाळी पाऊस आणि थंडीमुळे उत्तर प्रदेशातील साखर उत्पादनावर परिणाम झाला असल्याचे इस्माने म्हटले आहे.
महाराष्‍ट्र आणि कर्नाटकातील 50 साखर कारखान्यांमधील ऊस गाळपाचे काम बंद केल्यामुळे साखर उत्पादनाचे प्रमाण मंदावले आहे. त्यामुळे चालू वर्षात 24.3 दशलक्ष टन साखर उत्पादन होण्याची शक्यता ‘इस्मा’ने व्यक्त केली आहे. देशातील 452 साखर कारखान्यांनी 190 दशलक्ष टन उसाचे गाळप करून 18.8 दशलक्ष टन साखरेचे उत्पादन केले आहे.