आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sunita Sharma Appointed CEO Of LIC Housing Finance

‘एलआयसी एचएफएल’च्या सीईओपदी सुनीता शर्मा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- एलआयसी हाउसिंग फायनान्स लिमिटेडच्या व्यवस्थापकीय आणि मुख्य कार्यकारी अधिकारीपदी सुनीता शर्मा यांची नियुक्ती करण्यात आली आहे. विशेष म्हणजे कंपनीच्या स्थापनेपासून (1989) या पदावर विराजमान होणार्‍या शर्मा या पहिल्या महिला अधिकारी ठरल्या आहेत.

शर्मा या अगोदर भारतीय आयुर्विमा महामंडळाच्या गुंतवणूक विभागाच्या कार्यकारी संचालक या नात्याने समभाग संशोधन आणि जोखीम व्यवस्थापनाची जबाबदारी संभाळत होत्या. कार्यकारी संचालक या नात्याने काम करत असताना पेन्शन आणि समूह योजना यशस्वी करण्यात त्यांचा मोलाचा वाटा होता. महामंडळातील आपल्या तीन दशकांच्या कारकीर्दीत नवीन व्यवसाय, वित्त आणि लेखा आदी विविध जबाबदार्‍या त्यांनी यशस्वीपणे हाताळल्या. एलआयसी हाउसिंग फायनान्स लिमिटेडच्या उत्तर विभागाच्या विभागीय व्यवस्थापक म्हणूनही त्या कार्यरत होत्या.