आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सुपरबाइक पाच लाखांची!

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


मुंबई - नवीन वर्षाची दणक्यात सुरुवात करताना डीएसके ह्योत्सुंग कंपनीने तरुणाईसाठी दोन शानदार सुपरबाइक वाहन बाजारात दाखल केल्या आहेत. कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक शिरीष कुलकर्णी, एस अ‍ॅँड टी मोटर्सचे व्यवस्थापकीय संचालक जिमी पार्क आणि एस अ‍ॅँड टी मोटर्सचे व्यवस्थापक जेसन ली यांच्या उपस्थितीत या दोन सुपरबाइक्सचे अनावरण करण्यात आले.

ह्योत्सुंगच्या सुपरबाइकची धूम
अ‍ॅक्विला प्रो ही सर्वोत्तम क्रुझरपैकी एक असून ही बाइक लाल, चंदेरी आणि काळ्या रंगात उपलब्ध आहे. या बाइकची किमत 4,99,000 रुपये (एक्स शोरूम दिल्ली) आहे. या मोटारसायकलीला शक्तिशाली व्हिटवीन इंजिन असून ती 9000 आरएमपीला 74 बीएचपी अशी कमाल पॉवर देते. या बाइकचा ताशी वेग 195 किलोमीटर आहे.
जीटीआर 60 आर 2013 : ही बाइक टिटॅनियम, पांढरा, टिटॅनियम लाल आणि काळ्या रंगात उपलब्ध आहे. या बाइकची किंमत 4,79,000 रुपये (एक्स शोरूम दिल्ली).