आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुंतवणुकीचा पर्याय म्हणून एन्डोव्हमेंट प्लॅनची निवड नको

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
विमा एजंट विमा आणि गुंतवणूक यात संभ्रम निर्माण करतात. मुलांचे शिक्षण आणि लग्नासाठी किंवा निवृत्तीनंतरचे नियोजन यासारखी उद्दिष्टे साध्य करण्यासाठी एन्डोव्हमेंट पॉलिसीत (परंपरागत विमा संरक्षण) गुंतवणुकीचा सल्ला देतात. कर बचत, आयुर्विमा आणि बचतीच्या मुद्द्यांवर एजंट त्याचा आग्रह धरतात. मात्र, विमा पॉलिसीत गुंतवणूक कशी महाग पडते हे मात्र ते सांगत नाहीत. विमा संरक्षणाचा खर्च प्युअर टर्म योजनेपेक्षा कितीतरी जास्त असतो.
टर्म विमा खरेदी करा आणि फरक गुंतवा : तुमच्या काकाचे मित्र विमा एजंट आहेत, असे समजा. ते महिन्याकाठी 5000 रुपयांच्या बचतीचा सल्ला देत आहेत. जेव्हा मुलगी लग्नाची होईल, तेव्हा तुमच्या हाती एकरकमी मोठी रक्कम हाती येईल, असे ते सांगताहेत. तुमची रक्कम सुरक्षित राहील असेही सांगताहेत. कराबाबत सवलत मिळेल. तुम्ही शिस्तपूर्वक बचत करू शकता, तुम्हाला 10 लाख रुपयांचे आयुर्विमा संरक्षण मिळेल, असे ते सांगतात. भोळेभाबडे लोक सहज त्यात अडकतात. मात्र, यातून परतावा अत्यंत कमी प्रमाणात मिळतो. बचत खात्याहूनही कमी. बचत खात्यावर वार्षिक 4% परतावा मिळतो. आता आपण एन्डोव्हमेंट पॉलिसीचा अपॉर्च्युनिटी खर्च किती येतो ते पाहू. तुम्ही व्हॅनिला टर्म प्लॅन घेतला आहे असे मानुयात. यात गुंतवणुकीचा मुद्दा नाही. 35 वर्षे वयाकरिता 15 वर्षांसाठी 10 लाख रुपयांचे विमा संरक्षण आहे. यासाठी महिन्याला 200 रुपये हप्ता द्यावा लागणार आहे, 5000 रुपये लागणार नाहीत. टर्म प्लॅनच्या कालावधीत विमाधारकाचा मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबाला 10 लाख रुपये मिळतील. महिन्याला 200 रुपये हप्ता असल्याने 4800 रुपये महिन्याकाठी बचत होईल. वाचणारे पैसे चांगला परतावा देणा-या बचतीच्या इतर साधनांत गुंतवता येतील. तुम्ही वाचणारे 4800 रुपये सार्वजनिक भविष्य निर्वाह निधीत (पीपीएफ) गुंतवू शकता. दरवर्षी 57,600 रुपये 15 वर्षांसाठी पीपीएफमध्ये गुंतवावे. पीपीएफवर सध्या 8.60 टक्के व्याज मिळते. या हिशेबाने 15 वर्षांत 18.61 लाख रुपये मिळतील. ही रक्कम पूर्णपणे करमुक्त राहील. लिक्विडिटीच्या हिशेबाने विचार केल्यास सातव्या वर्षी पीपीएफमध्ये गुंतवलेल्या रकमेतून अर्धी रक्कम काढता येईल. तुम्ही एजंटाचा सल्ला मानला तर चार ते पाच लाखांचे नुकसान होईल. उदाहरणावरून हे स्पष्ट होते की, गुंतवणुकीसाठी एन्डोव्हमेंट प्लॅन चांगले नाहीत.
लेखक मान्यताप्राप्त गुंतवणूक मार्गदर्शक असून
द फायनान्शियल प्लॅनर्स इंडियाचे सदस्य आहेत.