आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एसयूव्हीकडून 13 टक्क्यांपेक्षा जास्त डिझेलचा वापर होतोय

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - तेल मंत्रालयाने अलिकडेच केलेल्या एका अभ्यासामध्ये हाय एन्ड मोटारी आणि एसयुव्हीकडून जवळपास 13 टक्के पेक्षा जास्त अनुदानावर मिळणा-या डिझेलचा वापर झाल्याचे दिसून आले आहे .पेट्रोलियम नियोजन आणि विश्लेषण विभाग मंत्रालयासाठी नेल्सनने केलेल्या एका अभ्यासामध्ये 2012-13 वर्षात देशात एकूण वापर झालेल्या 69.8 दशलक्ष टन डिझेलच्या तुलनेत खासगी मोटारींकडून 13.15 टक्के वापर झाला असल्याचे दिसून आले आहे.
खासगी मोटारी : 13.15 टक्के, व्यावसायिक वाहने : 8.94 टक्के, तिनचाकी : 6.39 टक्के, कृषी क्षेत्र आणि पम्प : 13 टक्के, उद्योग आणि विद्युत निर्मिती : 9 टक्के, मोबाइल टॉवर : 1.54 टक्के
ट्रक्स सारख्या व्यावसायिक वाहनांमध्ये डिझेलचा वापर सर्वाधिक 28.25 टक्के असल्याचे या अभ्यासात म्हटले असून जवळपास 70 टक्के डिझेलचा वापर हा वाहतूक क्षेत्राकडून होत आहे.
एकट्या वाहतूक क्षेत्रात पेट्रोलचा वापर जवळपास 99.6 टक्के असल्याचे अभ्यासात म्हटले असून त्यामध्ये बहुसंख्य म्हणजे 61.42 टक्के वापर दुचाकी तर 34.33 टक्के पेट्राल मोटारी आणि 2.34 टक्के वापर तिनचाकी वाहनांकडून होत असल्याचे अधिकृत निवेदनात म्हटले आहे. ओदिशा, बिहार, राजस्थान राज्यातल्या दुचाकीचा पेट्रोल वापर : 70
टक्क्यांपेक्षा जास्त
पेट्रोलच्या किमतींवरचे नियंत्रण हटले असले तरी डिझेलच्या किमती नियंत्रण मूक्त व्हायच्या आहेत. सध्या प्रती लिटर 8.47 अनुदान देण्यात येत असल्याचे या अभ्यासात म्हटले. 2012 - 13 या वर्षात डिझेलवर एकूण 92,061 कोटी रुपयांचे अनुदान देण्यात आले आणि एकूण इंधन अनुदानाच्या तुलनेत हे प्रमाण 57.2 टक्के आहे. जर असे असेल तर या प्रमाणात डिजेलचा वापर नेमका कुठे झाला हा प्रश्न आहे असे या अभ्यासात म्हटले आहे. क्षेत्रनिहाय डिझेलचा वापर लक्षात घेतला तर 2012 - 13 वर्षात एकूण 92,0621 कोटी रुपये वसुली होणे बाकी आहे.
अनुदान वसुलीचे स्वरुप
युटिलिटी वाहने आणि खासगी मोटार मालक : 12,100 कोटी रुपये, एसयुव्ही आणि व्यावसायिक वाहने : 8,200 कोटी रु., ट्रक्स : 26,000 कोटी रु., बस : 8,800 कोटी रु, कृषी क्षेत्र : 12,000 कोटी, अन्य क्षेत्र : 15,600 कोटी रु.