आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सुझलॉनचा २९०० कोटी तोट्याचा सौदा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
छायाचित्र: तुलसी तांती, अध्यक्ष, सुझलॉन समूह
पुणे - कर्जाच्या भाराखाली दबलेली सुझलॉन आपली जर्मनीतील सेनवियॉन कंपनी विकणार आहे. यासाठी अमेरिकेच्या सेंटरब्रिज कंपनीशी ७,२०० कोटी रुपयांचा (एक अब्ज युरो) सौदा केला आहे. हा व्यवहार मार्चपर्यंत पूर्ण होण्याची अपेक्षा आहे. सुझलॉनने २००७ मध्ये १.४ अब्ज युरोमध्ये (१०,०८० कोटी रुपये) सेनवियॉनची खरेदी केली होती. या व्यवहारात सुझलॉनला सुमारे २८८० कोटी रुपयांचा तोटा झाला आहे. या काळातील रुपयाच्या मूल्यातील २० टक्के घसरण त्यास जोडल्यास हा तोटा मोठा आहे. सुझलॉन या रकमेतून कर्ज फेडणार आहे. कंपनीवर सध्या १६,५०० कोटींचे कर्ज आहे. आता कंपनी ६००० कोटींचे कर्ज फेडणार आहे. यामुळे व्याजात ६०० कोटींची बचत होईल. सुझलॉन आता भारतासह अमेरिका, चीन, ब्राझील, तुर्कस्तान, मेक्सिको बाजारपेठांवर लक्ष केंद्रित करणार आहे.

७ वर्षांपूर्वी एका युरोचे मूल्य ६० रुपये होते, सध्या ७२ रुपये आहे. या हिशेबाने सेनवियॉनच्या विक्रीत कमी नुकसान आहे. या सौद्यामुळे कर्ज कमी होणे व व्यवसाय सुधारण्यास मदत होईल.
तुलसी तांती, अध्यक्ष, सुझलॉन समूह

व्यवहारपूर्तीनंतर एकतृतीयांश राहणार कारभार
२०१३-१४ मध्ये सुझलॉनचा एकूण महसूल ३,०६५ कोटी रुपये होता. या हिशेबाने पाहिल्यास सेनवियॉन विक्रीनंतर महसूल १,०७५ कोटींवर येईल.

सुझलॉन एनर्जी
* पवन ऊर्जेसाठी लागणा-या पवनचक्क्या तयार करणारी जगातील पाचवी सर्वात मोठी कंपनी
* ३१ देशांत कारभार
* १०,००० पेक्षा जास्त कर्मचारी
* ४३३ कोटी रुपयांचा तोटा एप्रिल -जून २०१४ मध्ये
* ५२८ कोटींचा तोटा सप्टेंबर तिमाहीत
* ९२४ कोटींचा तोटा मागील वर्षात ७.४५ % घसरणीसह १५.९१ रुपयांवर बंद झाले समभाग गुरुवारी

कंपनीवर दबाव
सुझलॉनचे अध्यक्ष तुलसी तांती यांनी काही दिवसांपूर्वी म्हटले होते, कंपनीवर ८००० कोटी रुपयांचे कर्ज आहे. त्यापेक्षा जास्त विदेशी कर्ज आहे. अनेक धनकोंनी मालमत्ता विकून कर्ज फेडण्यासाठी कंपनीवर दबाव आणला होता.

घाईत घेतला विक्रीचा निर्णय
सेनवियॉन विक्रीचा निर्णय घाईत घेण्यात आला. कच्च्या तेलाच्या घसरणा-या किमतीमुळे या जर्मन कंपनीला आणखी कमी किंमत मिळेल, अशी भीती कंपनीला होती.