आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

होंडा, सुझुकी मॉडेल्स आमने सामने

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
होंडाच्या नव्या युनिकॉर्न बाइकने १५० सीसी श्रेणीत आपले स्थान निर्माण करण्यात यश मिळवले आहे. या सेगमेंटमध्ये पूर्वी सुझुकी गिक्सर अव्वलस्थानी होती. या दोन्ही बाइकचे लूक्स शार्प, मॉडर्न आहेत. युनिकॉर्न या सेगमेंटमध्ये सरस सिद्ध होत आहे.

युनिकॉर्नमध्ये स्लिक हेडलँप, साइडला शार्प लाइन्स आहेत. गिक्सरचा लूक टफ आणि मस्क्युलर आहे. याचा हेडलँप क्लस्टर पुढच्या बाजूला लटकलेला असून टँक जास्त ठळक दिसतो. गिक्सर जास्त स्पोर्टी, फॉरवर्ड इनक्लाइंड व लेग्ज बॅक सीटिंग पोझिशन आहे. होंडा युनिकॉर्न आरामदायक आहे. सीटिंग पोझिशन अपराइट आहे. युनिकॉर्नचे १६२.७ सीसी इंजिन आहे. गिक्सरचे १५५ सीसी इंजिन आहे. गिक्सरचे आऊटपुट म्हणजे पॉवर व टॉर्क जास्त आहे.