आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Swiss Bank Account Opening Is As Easy As Opening A Domestic Account

SWISS BANKमध्ये असे उघडले जाते Account; नाव नव्हे क्रमांकावर चालतो व्यवहार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फोटो: स्वित्झर्लंडमधील सगळ्यात मोठी बॅंक USB)

नवी दिल्ली- स्वित्झर्लंडमधील एचएसबीसी बँकेतील भारतीय खातेदारांची माहिती उघड झाली आहे. इंग्रजी वृत्तपत्र 'इंडियन एक्स्पप्रेस'ने एचएसबीसी बँकेतील 1,195 भारतीय खातेदारांची नावे उघड केली आहेत. त्यात देशातील बडे उद्योपती, राजकीय नेते, हिर्‍यांचे व्यापारी आणि एनआरआयच्या नावांचा समावेश आहे.

आर्थिक वर्ष 2006-07 मध्ये खाते उघडलेल्या भारतीय खातेदारांची ही नावे आहेत. यामुळे स्विस बॅंकेत फक्त धनाढ्य व्यक्तीच का खाते उघडू शकतात काय? असा प्रश्न उपस्थित झाला आहे. स्विस बॅंकेत कोणता व्यक्ती खाते उघडू शकतो अथवा नाही. तसेच या खात्यावर पैशाचा व्यवहार कशापद्धतीने चालतो, याविषयी आम्ही माहिती घेऊन आलो आहे.

स्विस बॅंकेत असे उघडले जाते खाते...
स्वित्झर्लंडधील कोणत्याही बॅंकेत खाते उघडण्यासाठी ऑनलाइन अर्ज करावा लागतो.
अर्जदाराची संपूर्ण माहिती ऑनलाइनच भरली जाते अथवा बॅंकेचे प्रतिनिधी ई-मेलद्वारा देखील माहिती मागवून घेतात. विशेष म्हणजे स्विस बॅंकेत विनानावी खाते देखील उघडता येते. मात्र, त्यासाठी अर्जदाराला स्वत: स्वित्झर्लंडला जावे लागते.

विनानावी खाते उघडण्यासाठी अर्जदाराची सर्व दस्ताऐवज एखाद्या राजपत्रित अधिकार्‍याकडून साक्षांकित करणे आवश्यक असतात. स्वित्झर्लंडमधील बॅंकेत पर्सनल अकाउंट, सेव्हिग्ज अकाउंट आणि इन्वेस्टमेंट अकाउंटसह अन्य प्रकारात खाते उघडता
येते.

विनानावी खाते देखील उघडता येते...
आपल्या खातेदारांची माहिती गोपनिय ठेवण्यासाठी संपूर्ण जगात लोकप्रिय असलेल्या स्विस बॅंकेत ग्राहकांना विनानावी खाते देखील उघडता येते. खातेदारांना एक क्रमांक दिला जातो. त्या क्रमांकाच्या आधारे बॅंकेत खातेदाराला व्यवहार करता येतो. याचा अर्थ अशा खातेदारांची माहिती गोपनिय ठेवली जाते.

क्रमांकावरून चालतो व्यवहार...
विनानावी खाते उघडण्यासाठी मात्र अर्जदाराला गुंतागुंतीच्या प्रक्रियेतून जावे लागते.
अर्जदाराला स्वत: बॅंकेशी संपर्क साधावा लागतो. बॅंकेला आपली संपूर्ण माहिती द्यावी लागते. याशिवाय खाते उघडताना खात्यात कमीत कमी 1 लाख डॉलर्स डिपॉझिट ठेवावे लागतात. अशा खातेदाराचे नाव बॅंकेच्या निवडक अधिकार्‍यांना माहीत असते. एका क्रमांकावर खातेदाराचे सर्व व्यवहार केले जातात.
पुढील स्लाइड्‍सवर क्लिक करून वाचा, स्विस बॅंकेत कोण-कोण उघडू शकतो Account....