आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Syndicate Bank To Ink Pact With Firms For Mfs ‎

‘सिंडिकेट’चा बिर्ला सनसोबत करार

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - नेहमीच्या बॅँकिंग व्यवहाराबरोबरच गुंतवणुकीचे अन्य पर्याय उपलब्ध करून देण्यासाठी सिंडिकेट बॅँकेने आपल्या ग्राहकांसाठी म्युच्युअल फंड उत्पादने उपलब्ध करून दिली आहेत. या म्युच्युअल फंड उत्पादनांच्या वितरणासाठी बँकेने बिर्ला सन लाइफ अ‍ॅसेट मॅनेजमेंट कंपनी आणि रिलायन्स कॅपिटल अ‍ॅसेट मॅनेजमेंट कंपनीबरोबर करार केला केला आहे.
बिर्ला सन लाईफ अ‍ॅसेट मॅनेजमेंटचे मुख्य कार्यकारी अधिकारी ए. बालसुब्रमण्यम, रिलायन्स कॅपिटल अ‍ॅसेट मॅनेजमेंटचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुदीप सिक्का आणि बॅँकेचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक एम. जी. संघवी यांनी या करारावर स्वाक्ष-या केल्या.
ग्राहकांना एकाच ठिकाणी बँकिंग आणि गुंतवणूक सुविधा उपलब्ध करून देण्याच्या सततच्या प्रयत्नाचा एक भाग म्हणून अ‍ॅसेट मॅनेजमेंट कंपन्यांबरोबर करार करण्यात आला आहे. त्यामुळे बँकेच्या शाखांना फायनान्शियल सुपर मार्केट म्हणून काम करता येऊ शकेल असे संघवी यांनी सांगितले.
अन्य सुविधांमध्ये बॅँक आता लवकरच सोन्याच्या नाण्यांची विक्री सुरू करणारर असून तंत्रज्ञानाशी निगडीत सेवा पुरवठ्यासाठी ‘ई- लाँज’चा प्रारंभ आणि मूल्याधिष्ठीत सेवांमध्ये वाढ करण्यासाठी गिफ्ट कार्ड बाजारात आणण्याच्या विचारात आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.