आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

टॅब्लेटच्या विक्रीला मागणीअभावी झटका

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - देशात स्मार्टफोनची विक्री गतीने वाढत असली तरी टॅब्लेटची विक्री मात्र कमी होत आहे. मागणी कमी झाल्याने 2014 च्या जानेवारी ते मार्च या काळात भारतीय बाजारात येणार्‍या टॅब्लेटच्या आयातीत 32.8 टक्के घट आली आहे. इंटरनॅशनल डाटा कॉर्पोरेशनच्या (आयडीसी) ताज्या अहवालातून ही बाब समोर आली आहे.
बीआयएसचे नियम ठरले भारी : टॅब्लेट कंपन्यांसाठी स्क्रीनप्रिंट किंवा त्याच्याशी संबंधित ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्डचे (बीआयएस) नियमांचे पालन करणे जिकिरीचे ठरले आहे. यात कंपन्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो आहे. आगामी काळातही टॅब्लेटची विक्री जानेवारी ते मार्च या काळात झालेल्या विक्रीच्या आसपास राहण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
लाँचिंगवर परिणाम
आयईडीसीच्या मते, बहुतेक टॅब्लेट व्हेंडर्स याची आयात करतात. जेथून टॅब्लेट मागवले जाते तेथूनच टॅब्लेट हार्डवेअर डिझाइनमध्ये बदल होत असतो. अशातच टॅब्लेटचा पुरवठा वेळेवर झाला नाही तर त्याच्या लाँचिंगवर परिणाम होतो. त्यामुळे उत्पादन वेळेवर बाजारात उपलब्ध होत नाही आणि मागणी घटते.
फॅब्लेटचा वाढता बाजार
या शिवाय 5.5 ते 6.99 इंच स्क्रीन असणार्‍या फॅब्लेटच्या वाढत्या बाजारपेठेमुळे टॅब्लेट्सच्या विक्रीत घट येत आहे. विशेषत: 7 इंच व त्यापेक्षा मोठी स्क्रीन असणार्‍या टॅब्लेटवर याचा जास्त परिणाम होत आहे. आयईडीसीचे वरिष्ठ बाजार विश्लेषक करण ठक्कर यांनी सांगितले, छोट्या कंपन्या आपले टॅब्लेट बाजारात उतरवू शकत नाहीत. मात्र, याचा लाभ बाजारपेठेतील बड्या कंपन्यांनाही होत नसल्याचे चित्र आहे. अशातही 47.5 टक्के हिश्श्यासह सॅमसंग टॅब्लेट बाजारात क्रमांक एकची कंपनी आहे.