आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Taj Hotel Group Will Start Five Star Hotel And Training Center At Lavasa

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

लवासात ताज, देशातील अग्रणी ग्रूप सुरु करणार हॉटेल आणि प्रशिक्षण केंद्र

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे- देशातील पंचातारंकित हॉटेलमध्‍ये अग्रस्‍थानी असलेले ताज हॉटेल लवासा येथे 100 कोटी रूपये खर्चून एक पंचतारांकित हॉटेल उभारणार असून तिथेच स्वित्‍झर्लंडमधील इकोल हॉटेलच्‍या सहकार्याने जागतिक दर्जाचे प्रशिक्षण केंद्रही उभारणार असल्‍याची माहिती, ताज हॉटेल्‍सचे व्‍यवस्‍थापकीय संचालक रेमंड बिक्‍सन यांनी पत्रकारांनी दिली. आदरातिथ्य सेवा क्षेत्रात कुशल मनुष्यबळाची केवळ भारतातच नव्हे तर आशिया आणि पश्चिमेकडील देशातही याची कमतरता आहे. त्‍यामुळे या क्षेत्रात असून रोजगाराची प्रचंड संधी असल्‍याचेही त्‍यांनी यावेळी सांगितले.

पुणे जिल्ह्यातील लवासा येथे ताज समूह 100 कोटी रुपये गुंतवून 80 ते 100 खोल्यांची क्षमता असलेले नवे हॉटेल उभारणार आहे. हॉटेल आणि पर्यटन क्षेत्रात देशात एक डॉलर गुंतवला तर त्यातून आठ डॉलर इतका उद्यम व्यवसाय मिळतो असे नमूद करून ते म्हणाले, की गेल्या वर्षात केवळ पंचतारांकित हॉटेलात 12 हजार नव्या खोल्यांची भर पडली आहे. मात्र त्या तुलनेत कुशल मनुष्यबळ निर्माण झालेले नाही. तसेच केंद्र आणि राज्याच्या पर्यटन खात्यात आणि अनुषंगिक क्षेत्रात म्हणजे बीपीओ, विमानसेवा, बँकिंग यांनाही अशा प्रकारचे मनुष्यबळ लागते आहे. देशातच आणखी 30 नवी तारांकित हॉटेल उभी राहणार असल्याने किती गरज निर्माण होईल हे लक्षात येते.

ताज समूह नव्याने उभारत असलेले हॉटेल येत्या दोन ते पाच वर्षात हस्ते पूर्ण होणार आहे. भारतात प्रशिक्षण घेण्यास परदेशातील लोक येऊ शकतात ज्यामुळे देशाला परकीय चलन मिळेल. स्वित्झर्लंडमधील इकोल हॉटेल द लुसानच्या सहकार्याने जागतिक दर्जाचे प्रशिक्षण देणारी संस्था 70 कोटी रुपये खर्चून लवासा येथे उभारण्यात आली आहे. त्याचे उद्घाटन बिक्सन यांच्या हस्ते शुक्रवारी झाले. तसेच दीक्षांत समारंभही झाला. पहिल्या तुकडीतील 21 जणांना ओबेरॉय, मॅरीयाट, राडीसन येथे नोकरी मिळाली आहे. हा अभ्यासक्रम चार वर्षाचा असून त्यासाठी 20 लाख रुपये शुल्क आहे. 450 विद्यार्थी घेण्याची या संस्थेची क्षमता असून प्रवेश परीक्षा आणि मुलाखतीतून निवड केली जाते. एक वर्ष भारतात आणि दोन वर्षे परदेशात कार्यानुभव दिला जातो तसेच प्रमाणपत्रही दिले जाते.

सुरक्षाविषयक प्रशिक्षण
भारतात आणि जगभरात होणारे वाढते दहशतवादी हल्ले लक्षात घेऊन इकोल संस्थेतून बाहेर पडणाऱ्या मुलांना सुरक्षाविषयक प्रशिक्षण दिले जाते अशी माहिती यावेळी मुख्‍याधिकारी रोनी कुरियन यांनी दिलि. त्यासाठी लष्करातून निवृत्त झालेल्या अधिकारी लोकांची मदत घेतली जाते.