आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वेळ आलीये FACEBOOK मॅनर्सची, अशी घडवा तुमची ऑनलाइन इमेज

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पहिले आपण वेळ मिळाला की घरातील इतर सदस्यांबरोबर चर्चा करायचो. पण आजच्या अतिशय धावपळीच्या जीवनात एकमेकांशी बोलायला कुणालाच वेळ नसल्याचे विदारक चित्र निर्माण झाले आहे. आपल्याच घरातील माणसांशी बोलायला आज तरूणांना वेळ नाही. पण मित्रांसोबत तासं-तास गप्पा मरायला भरपूर वेळ आहे.
ब-याच घरामध्ये आई जेवणासाठी जिवाच्या आकांताने हाका मारत असते. पण आजचा तरूण म्हणा किंवा मोठा म्हणा एका सवयीचा गुलाम झाला आहे. या त्याच्या गुलामीचा दिवस त्याने दिवसभर काय-काय केलं याचे अपडेट टाकण्यात जातो. माझ्या या शेवटच्या वाक्यातून बहूदा तुम्हाला मी कुठल्या गुलामीबद्दल बोलत आहे हे समजलंच असेल. होय, मी सोशल मीडियाबद्दल बोलतोय. आज लहानापासून ते मोठ्यापर्यत सगळेच सोशल मीडियच्या अतिप्रेमात पडल्याचे चित्र आहे.
वापरण्यास सोपे, स्वत;ची भावना अगदी काही सेकंदांमध्ये अवघ्या जगातील (ओळखीचे आणि अनोळखी) असंख्य लोकापर्यंत पोहोचवली जात असल्याने आपण दिवसभरात काय करतो, काय करणार आहोत हे आपल्याच घरातील लोकांना माहिती होण्याआधी संपूर्ण जगाला समजली असते. पण आपण ही माहिती जेव्हा एखाद्या सोशल मीडियावर अपलोड करत असतो ती किती प्रमाणात करायची याच्यावर आपले नियंत्रण असायला हवे. परंतु याचे तारतम्य आजच्या कुठल्याच युवकाकडे असल्याचे दिसत नाही. या वैयक्तीक अपडेट टाकण्यामुळे ब-याच गंभीर घटना आजुबाजूला घडल्या आहेत. तरी देखील आपल्याला जाणिव होत नाही हे विचार करण्यासाखचं आहे.
लहानपणी आपल्यावर काही चांगले संस्कार केले जातात. ते करण्यापाठीमागे हाच उद्देश असतो की, आपल्याला चांगल्या सवयी लागाव्यात. पण बहूदा ते संस्कार आजची पिढी विसरत चालली आहे. असो... आता सगळेच जण ऑनलाइन आयुष्य जगत असल्यामुळे मला देखील तुम्ही नेमके फेसबुकवर काय शेअर करायला हवे काय नको हे ऑनलाइनच सांगावे लागणार आहे. मी तुम्हाला असे म्हणणार नाही तुम्ही आजपासूनच फेसबुक वापरणे बंद करा. पण ते वापरतांना नेमकं काय-काय शेअर करावे हेच सगळे जण विसरले आहेत.
चला तर मग जाणून घेऊ की, नेमकं ऑनलाइन असताना काय काय शेअर केलं पाहिजे आणि काय-काय टाळलं पाहिजे याबद्दल...