आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Take Dividend Through Systmatic Investment Plan In Mutual Fund

म्युच्युअल फंडामध्ये ‘सुनियोजित गुंतवणूक योजना’तून मिळणार चांगला परतावा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - गेल्या वर्षात म्युच्युअल फंडामध्ये ‘सुनियोजित गुंतवणूक योजना’ अर्थात ‘सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन’ (एसआयपी-सिप) या गुंतवणूक पर्यायाने चांगला परतावा दिला होता. यंदाच्या वर्षातही हाच कल कायम राहून चांगला परतावा मिळण्याचा अंदाज तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे.
भांडवल बाजारातील सध्याच्या अस्थिर वातावरणात एसआयपी हाच एक उत्तम पर्याय गुंतवणूकदारांसाठी ठरू शकतो. व्याजदर कमी झाले तर डेट फंडांसारख्या योजनांमधूनदेखील गुंतवणूकदारांना या वर्षात चांगली मिळकत होऊ शकते, असे मत ‘फंड्सइंडिया.कॉम’ या म्युच्युअल फंड संशोधन कंपनीच्या प्रमुख विद्या बाला यांनी ‘दिव्य मराठी’शी बोलताना व्यक्त केले. एसआयपीचे वेगवेगळे प्रकार असल्याने त्यांच्या कामगिरीचा नेमका आढावा शक्य नाही. मागील वर्षाचा मागोवा घेता ‘आयसीआयसीआय प्रू फोकस्ड ब्ल्यूचीप’सारख्या लार्ज कॅप फंडांनी 31 डिसेंबरपर्यंत 16 टक्के वार्षिक परतावा दिला होता. दुस-या बाजूला ‘एचडीएफसी मिडकॅप अपॉर्च्युनिटीज’ या मिडकॅप फंडाने 19.4 टक्के इतका सर्वाधिक परतावा दिला. अस्थैर्यात गुंतवणुकीसाठी ‘एसआयपी’ चांगला पर्याय आहे.
जानेवारी ते डिसेंबर 2013 : तुलनात्मक परतावा
साधन परतावा
म्युच्युअल फंड (डायव्हर्सिफाइड) 19 %
म्युच्युअल फंड (थीम बेस) 50 %
म्युच्युअल फंड (इक्विटी) 6 %
साधन परतावा
सेन्सेक्स 9 %
निफ्टी 6.89 %
सोन 4.5 %
टॉप 10 म्युच्युअल फंड
० फ्रँकलिन इंडिया ब्ल्यूचिप : भांडवल बाजारात तेजी असताना फायदा देण्याची या फंडाची ख्याती आहे. बाजाराचा दीर्घकालीन अनुभव असलेल्या मोजक्या फंडांपैकी एक फंड.
० आयडीएफसी प्रीमियर इक्विटी : मिडकॅपकडे ओढा असला तरी हा फंड उत्तम कंपन्या निवडण्यात यशस्वी. या फंडात फारसा चढ-उतार होताना दिसत नाही म्हणूनच इतर मिडकॅप फंडांच्या तुलनेत मंदीच्या काळात या फंडात थेट घसरण होण्याची शक्यता कमी.
० आयसीआयसीआय प्रू फोकस्ड ब्ल्यूचिप : मापदंडांना मोडीत काढण्यात सातत्याने यशस्वी. गेल्या तीन वर्षांपासून निफ्टीचा विक्रम 93 वेळा एक वर्ष परतावा तत्त्वावर मोडला आहे.
० क्वांटम लाँग टर्म इक्विटी फंड : मंदीच्या काळात तीव्र घसरण टाळण्यासाठी अ‍ॅक्टिव्ह कॅश कॉल्स. ऊर्जा आणि ऑटो टॅपिंगसारख्या चाकोरीबाहेरच्या क्षेत्रात गुंतवणूक.
० मीराई अ‍ॅसेट इंडिया अपॉर्च्युनिटीज : मर्यादित जोखमीसह संधी शोधतो. त्यामुळे कमी जोखीम पत्करून गुंतवणूक करणा-यांसाठी चांगला पर्याय.
० एचडीएफसी चिल्ड्रन्स गिफ्ट इन्व्हेस्टमेंट प्लॅन (बॅलन्स्ड फंड) : समभागावर लक्ष ठेवलेला बॅलन्स फंड असून या प्रकारामधला कमी माहिती असलेला फंड. कारण तो केवळ 18 वर्षांखालील मुलांच्या नावानेच काढता येतो. खुल्या मुदतीची योजना आहे.
० फ्रँकलिन इंडिया टॅक्सशिल्ड (करबचत) : लार्जकॅपवर लक्ष ठेवून असलेला करबचत फंड. गेल्या दहा वर्षांत पाच टक्क्यांएवढ्या गुणांसह सर्व मापदंडांना मात.
० आयसीआयसीआय प्रुडेन्शियल टॅक्स प्लॅन (करबचत फंड) : समभागांमधील जोखीम पत्करण्याची तयारी आणि करातून थोडी विश्रांती हवी असलेल्या गुंतवणूकदारांसाठी सुयोग्य
० बिर्ला सनलाइफ डायनामिक बाँड फंड (डेट फंड) : यात क्रेडिट आणि व्याजदराची जोखीम मर्यादित असल्याने कोणत्याही रोखासंग्रहासाठी हा फंड चांगला पर्याय.
० मॉर्गन स्टॅन्ले शॉर्ट टर्म बाँड फंड (डेट फंड) : अल्प मुदतीचा फंड असला तरी डेटमध्ये अनावश्यक जोखीम पत्करण्याची तयारी नसलेल्या गुंतवणूकदारांसाठी योग्य.