आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Talwalkars Set Up Taluka Level 300 Gymkhana All Over Country

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

तळवलकर्स देशभरातील तालुका स्तरावर, 300 व्यायामशाळा स्थापणार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कोल्हापूर - ‘हिट इंडिया, फिट इंडिया’ संकल्पनेतून देशभरातील तालुकास्तरीय शहरांमध्ये 300 छोट्या व्यायामशाळा उभारल्या जात असल्याची माहिती तळवलकर बेटर व्हॅल्यू फिटनेसचे कार्यकारी संचालक मधुकर तळवलकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.

कोल्हापुरात तळवलकर हेल्थ क्लबच्या शुभारंभानिमित्ताने त्यांनी ही माहिती दिली.सांगली जिल्ह्यातील आष्टा येथील तळवलकर कुटुंब. पैलवान विष्णू तळवलकर यांनी वालावलकर सर्कसमधील नोकरी सोडून मुंबईत व्यायामशाळेत नोकरी पकडली. यानंतर घरी जाऊन व्यायाम शिकवायला सुरुवात केली. रामकृष्ण फिजिकल कल्चरल इन्स्टिट्यूशन या नावे 18 मार्च 1932 रोजी खारला आणि नंतर नाव बदलून 1939 ला गिरगावमध्ये व्यायामशाळा सुरू केली. व्यायामाचे वाढते महत्त्व व घरामधील व्यायामाचे वातावरण यामुळे त्यांनी नोकरी सोडून जुलै 1962 मध्ये तळवलकर जिम्नॅशियम या नावे व्यायाम प्रशिक्षणास सुरुवात केली. या संस्थेचा व्याप वाढत असून 50 वर्षे पूर्ण झाल्यानंतर आता तळवलकर यांनी हायफाय संकल्पना राबवण्याचा निर्धार केला आहे.