आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Tarini International To Launch ₹16 cr IPO On June 9

तारिणी इंटरनॅशनलची भागविक्री सोमवारपासून

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - भौगोलिकदृष्ट्या उत्तम प्रकल्प विस्तार असलेल्या आणि आफ्रिकन उपखंडातही अस्तित्व असलेली तारिणी इंटरनॅशनल लिमिटेड भांडवली बाजारात प्रवेश करत आहे. कंपनी प्रत्येकी 10 रुपये दर्शनीमूल्याचे 39,78,000 समभाग आणत असून त्याची विक्री नऊ जूनपासून सुरू होऊन 13 जून रोजी बंद होणार आहे .

प्रत्येकी 41 रुपये किमतीने विक्री होणार्‍या भागविक्रीतून कंपनीला 1,630.98 लाख रुपयांचा एकूण निधी उभा राहणे अपेक्षित आहे. ‘मार्केट मेकर’साठी आरक्षित 2,01,000 भांडवली समभाग सोडल्यास, सार्वजनिक विक्रीसाठी शिल्लक समभागांची संख्या 37,77,000 इतकी होते. ही संपूर्ण भागविक्री आणि नक्त सार्वजनिक विक्री यांचा कंपनीच्या भरणा झालेल्या भागभांडवलात विक्रीपश्चात अनुक्रमे 30.607 आणि 29.067 इतका हिस्सा होईल. या सार्वजनिक समभाग विक्रीची नोंदणी मुंबई शेअर बाजाराच्या लघु आणि मध्यम उद्योग मंचावर करण्याचा प्रस्ताव आहे. या भागविक्रीसाठी गिनीस कॉर्पोरेट अ‍ॅडव्हायजर्स प्रा. लि. यांची प्रधान व्यवस्थापक (लीड मॅनेजर) म्हणून तर लिंक इनटाइम इंडिया प्रा. लि. ची निबंधक (रजिस्ट्रार) म्हणून नियुक्ती केली गेली आहे.

खेळत्या भांडवलाच्या वाढत्या गरजेची दीर्घकालीन पूर्तता करण्यासाठी आणि त्याचप्रमाणे ब्रॅँड प्रतिमा उंचावण्यासाठी या भागविक्रीतून उभारण्यात येणारा काही निधी कंपनी अंशत: वापरणार आहे. या शिवाय कंपनीच्या नोंदणीकृत कार्यालयाच्या अंतर्गत सजावट व नूतनीकरणासाठी तसेच सामान्य उद्यम खर्चाची तरतूदही या भागविक्रीतृन मिळणार्‍या निधीद्वारे अंशत: केली जाईल.

जलविद्युत निर्मिती प्रकल्पांसाठी, विजेचे पारेषण व वितरण तसेच पायाभूत सुविधा उभारणीतील एक महत्त्वपूर्ण अभियांत्रिकी अंग म्हणून ही कंपनी उदयाला आली असून गेल्या काही वर्षात सर्व सेवा एकाच छताखाली देत आहे.