आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस कॅम्पस मुलाखतींद्वारे देणार ३५ हजार नोक-या

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - पुढील वर्षात कॅम्पस मुलाखतींद्वारे ३५ हजार नोक-या देण्याच्या उद्दिष्टावर ठाम असल्याचे टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (टीसीएस) या भारतातील सर्वात मोठ्या सॉफ्टवेअर कंपनीने स्पष्ट केले आहे. कंपनीचे सीईओ व व्यवस्थापकीय संचालक एन. चंद्रशेखरन यांनी ही माहिती दिली.

गेल्या ऑक्टोबरमध्ये टीसीएसने २०१६ मध्ये ३५ हजार फ्रेशर्सना कॅम्पस इंटरव्ह्यूतून नोक-या देण्याची घोषणा केली होती. त्यापैकी २०१५ या वर्षात २५ हजार जणांना नोक-या देण्यात आल्या. तथापि, कंपनीने काम समाधानकारक नसल्याचे सांगत एक हजार जणांना काढलेही आहे.