आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

टाटा डोकोमोच्या इंटरनेट दरात मोठी कपात

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- टाटा डोकोमो या कंपनीने इंटरनेट दरात सुमारे ९० टक्क्यांनी कपात करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. येत्या १ जु्लैपासून प्रति एककिलोबाईट इंटरनेट वापरासाठी १० पैशांऐवजी चक्क १ पैसा हा नवीन दर आकारला जाणार आहे.

यासंदर्भात टाटा डोकोमोचे विपणन प्रमुख गुरिंदरसिंग यांनी सांगितले, की इंटरनेट दरात कपात करण्याच्या या निर्णयामुळे टाटा डोकोमोच्या वापरात निश्चितच वाढ होईल. डोकोमो धारकांनाही याचा मोठा फायदा होईल.

नव्या इंटरनेट दरानुसार २जी इंटरनेट धारकांसाठी १२६ रु रिचार्जवर २ जीबी इंटरनेट (महिन्याभरासाठी), १४९ रु रिचार्जवर २.५ जीबी इंटरनेट (महिन्याभरासाठी) आणि २४९ रु रिचार्जवर ३ जीबी इंटरनेट (दोन महिन्यासाठी) वापरता येणार आहे

थ्रीजी इंटरनेट धारकांना प्रति १० केबी इंटरनेट वापरासाठी १ पैसा खर्च येणार आहे. यापूर्वी इंटरनेट सेवा पुरविणाऱ्या वोडाफोन, एअरटेल आणि आयडिया या कंपन्यांनीही गेल्या आठवड्यात इंटरनेट दरात कपात केली आहे.