Home | Business | Auto | tata indica, sale average, hatback indica, business, national

सर्वाधिक माइलेज देणारी 'हॅचबॅक इंडिका' हीट नाही

agency | Update - Jun 04, 2011, 05:17 PM IST

देशातील वाहन विक्रीतील प्रमुख कंपनी टाटा मोटर्सने मार्चमध्ये लॉंच केलेली हॅचबॅक इंडिका गाडीची नवी मॉडेल ईवी-२ ही गाडी ग्राहकांच्या पसंतीला आली नाही.

  • tata indica, sale average, hatback indica, business, national

    tataindicaev2_258नवी दिल्ली- देशातील वाहन विक्रीतील प्रमुख कंपनी टाटा मोटर्सने मार्चमध्ये लॉंच केलेली हॅचबॅक इंडिका गाडीची नवी मॉडेल ईवी-२ ही गाडी ग्राहकांच्या पसंतीला आली नाही. सर्वाधिक मायलेज व माफक किंमत असून म्हणावी तशी विक्री झाली नसल्याचे दिसून येत आहे. ही गाडी प्रतिलिटर २५ किलोमीटर इतकी मायलेज देते. असे असूनही मार्चपासून बाजारात आलेल्या गाडीची चांगली विक्री झाली नाही.
    मार्चमध्ये सुमारे ७००० हजार इंडिका गाडीची विक्री झाली. जी गेल्या वर्षीपेक्षा ४० टक्क्यांनी कमी आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत एप्रिल व मे मध्येही अनुक्रमे ५३ व ३५ टक्के कमी विक्री झाली आहे. याबाबत इंडिकाचे (विक्री) विभागाचा प्रवक्ता म्हणाला की, इंडिका गाडीची हळू-हळू विक्री वाढत आहे.
    याबाबत फेडरेशन ऑफ ऑटोमोबाईल डीलर्स एसोसिएशन (फाडा) चे उपाध्यक्ष व टाटा मोटर्स डीलर कंपनीचे कार्यकारी संचालक मोहन हिम्मतसिंघा म्हणाले, की ग्राहक इंडिका गाडीकडे एक टॅक्सी गाडी म्हणून पाहतो. त्याबाबत कंपनीने काही ठोस पावले उचलायला हवीत. याबाबत कपिल अरोरा म्हणाले, ग्राहकांचा बदलता कौल लक्षात घेऊन कंपन्यांनी आपल्या उत्पादनात बदल केला पाहिजे. ग्राहकाच्या आवडीनिवडीकडे व समाधानाकडे लक्ष दिले पाहिजे.



Trending