आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सेलेरिओ, फिगोला टक्कर देणार टाटाची काइट कार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- वाहनांच्या घटत्या विक्रीमुळे हैराण असणार्‍या टाटा मोटर्सने एक नवी कार बाजारात आणण्याची तयारी केली आहे. मारुती आणि फोर्डच्या छोट्या कारला टाटाची नवी कार टक्कर देणार आहे. या कारचे डिझाइन, इंजिन आदींवर कंपनीने काम सुरू केले आहे. टाटा मोटर्समधून मिळालेल्या माहितीनुसार कारचे सांकेतिक नाव काइट असे ठेवण्यात आले आहे. काइट 2015 मध्ये बाजारात दाखल होईल. टाटा मोटर्सच्या साणंद येथील प्रकल्पात काइट तयार होणार आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार काइट कार एमवाय 15 अंतर्गत विकसित केली जात आहे. ही एक कॉम्पॅक्ट कार राहील. या प्रकारच्या कार भारतात सर्वाधिक विकल्या जातात. मारुतीच्या आगामी काळात येणार्‍या कार विचारात घेऊन काइट बनवण्यात येत आहेत. काइट कार इंडिका आणि नॅनो यांच्या मधील श्रेणीची राहील.