आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Tata Mahindra News In Marathi, Affordable Home Scheme, Divya Marathi

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

टाटा-महिंद्रा देणार स्वस्त घरे

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - देशातील नागरिकांना स्वस्तात घरे उपलब्ध करून देण्यासाठी आता बड्या कॉर्पोरेट घराण्यांनी पुढाकार घेतला आहे. महिंद्रा आणि टाटा यांनी यात पुढचे पाऊल टाकले आहे. या समूहांनी आता आपले लक्ष वाजवी किमतीतील गृहप्रकल्पांवर केंद्रित केले आहे. महिंद्रा समूहाची रिअ‍ॅल्टी कंपनी महिंद्रा लाइफ स्पेसने वाजवी किमतीतील गृहप्रकल्प (अफॉर्डेबल हाउसिंग) वर सर्व लक्ष केंद्रित केले असून त्यासाठी कंपनीने हॅपीनेस्ट हा प्रकल्प जाहीर केला आहे. हॅपीनेस्ट नावाचे हे प्रकल्प मुंबई आणि चेन्नई येथे साकारणार आहेत.

स्वस्त घरांची कमतरता
उद्योग क्षेत्रातील संघटना असोचेमच्या मते, भारतातील मागणीचा लक्षात घेता दोन कोटींपेक्षा जास्त स्वस्त घरांची कमतरता आहे. उपलब्ध घरांच्या उच्च पातळीतील किमती आणि मागणीनुसार किमती नसल्यामुळे घरांच्या विक्रीत घट होत आहे. सध्या प्रीमियम किमतीतील घरे देण्यावर विकासकांचा भर आहे. मात्र मागणी 5 ते 25 लाख रुपयांच्या अफॉर्डेबल घरांसाठी जास्त आहे.

अफॉर्डेबल हाउसिंग नेमके काय आहे
ज्या कुटुंबांचे उत्पन्न सरासरी इतके अथवा त्याहून कमी असते अशा वर्गाला सहजपणे खरेदी करता येतील अशी घरे अफॉडेबल हाउसिंग अर्थात वाजवी दरातील घरे या अंतर्गत येतात. देशनिहाय अफॉर्डेबल हाउसिंगची परिभाषा बदलते. मात्र काही प्रमाणात समानता असते. जसे निम्न तसेच मध्यम उत्पन्न गटातील लोकांचा विचार करून घरे बनवली जातात. विकसनशील देशात अफॉर्डेबल हाउसिंग एक प्रमुख मुद्दा बनला आहे. अशा देशात लोकसंख्येचा मोठा भाग बाजार मूल्यावर आधारित घरे खरेदीस सक्षम नाही.

3000 कोटींची गुंतवणूक
टाटा समूहातील टाटा हाउसिंग डेव्हलपमेंट या रिअ‍ॅल्टी कंपनीने चालू आर्थिक वर्षात जमिनीचे अधिग्रहण आणि नवे प्रकल्प यासाठी 3000 कोटी रुपयांच्या गुंतवणुकीची घोषणा केली आहे. या कंपनीची स्थापना 1984 मध्ये जे.आर.डी. टाटा यांनी केली होती. कमी उत्पन्न गटातील वर्गासाठी कमी खर्चाची घरे बनवणे अशी या कंपनीची ओळख आहे. 2010 मध्ये कंपनीने स्मार्ट व्हॅल्यू होम्स लिमिटेड सादर केला होता. या अंतर्गत देशात 4.10 लाख किमतीची घरे देण्यात येतात.

एक वर्षात मिळणार घर
महिंद्रा लाइफ स्पेसने सांगितले, ज्या कुटुंबांचे मासिक उत्पन्न 20 हजार ते 40 हजार रुपये आहे, अशा कुटुंबांचा विचार करून हा प्रकल्प उभारण्यात येणार आहे. महिंद्रा लाइफ स्पेसच्या एमडी आणि सीईओ अनिता अर्जुनदास यांनी सांगितले, हॅपीनेस्ट अंतर्गत बनवण्यात येणा-या घरांच्या किमती 10 ते 20 लाख रुपयांदरम्यान असतील. कंपनी पहिला प्रकल्प चेन्नईत तर दुसरा मुंबईत उभारणार आहे. दोन्ही प्रकल्प रेल्वेस्टेशनपासून 3 ते 4 किलोमीटर अंतरावर असतील. प्रकल्प जाहीर झाल्यापासून एक वर्षांच्या आत ग्राहकांना घरे उपलब्ध करून देण्याची कंपनीची योजना आहे.