Home | Business | Auto | tata motores get 1111truck order

टाटा मोटर्सला मिळाली १,१११ ट्रकनिर्मितीची आॅर्डर

Agency | Update - Jun 11, 2011, 04:27 AM IST

या महिन्यापासूनच ट्रक द्यायला सुरू केले जाईल

  • tata motores get 1111truck order

    नवी दिल्ली सुरतमधील सिद्धिविनायक लॉजिस्टिक लिमिटेडकडून अंदाजे १५० कोटी रुपये किमतीच्या १,१११ मध्यम आणि जड ट्रक्सची आॅर्डर मिळाली असल्याची माहिती आज टाटा मोटर्सने दिली आहे. या महिन्यापासूनच ट्रक द्यायला सुरू केले जाईल आणि वित्तीय वर्ष संपण्यापूर्वी ही आॅर्डर पूर्ण होईल, अशी माहिती टाटाचे विक्री व विपणन मुख्याधिकारी विनोद सहाय यांनी दिली. आम्ही टाटा मोटर्सचे पहिले वाहन १९८८ मध्ये घेतले तेव्हापासूनच आम्ही कंपनीची मध्यम व जड वाहने खरेदी करीत आहोत. टाटा मोटर्सच्या सहकार्याने आम्ही आमचा व्यापार वाढवणार आहेत, अशी माहिती सिद्धिविनायक लॉजिस्टिकचे प्रमुख आर. सी. बैद यांनी दिली.

Trending