Home | Business | Auto | tata motors car sale decrease, business, india

बाजारात टाटा मोटर्सच्या प्रवासी मोटारींची निर्यात घसरली

agency | Update - Jun 02, 2011, 10:58 AM IST

टाटा मोटर्सच्या एकूण वाहन विक्रीमध्ये १o टक्क्यांनी वाढ होऊन ती अगोदरच्या वर्षातल्या ५६,७७५ मोटारींवरून ६२,२९६ मोटारींवर गेली आहे.

  • tata motors car sale decrease, business, india

    tata_258टाटा मोटर्सच्या एकूण वाहन विक्रीमध्ये १o टक्क्यांनी वाढ होऊन ती अगोदरच्या वर्षातल्या ५६,७७५ मोटारींवरून ६२,२९६ मोटारींवर गेली आहे. परंतु, स्थानिक बाजारपेठेतील प्रवासी मोटारींची निर्यात ९ टक्क्यांनी घसरून ती २१,३२४ मोटारींवरून १९,४०१ मोटारींवर आली आहे. प्रवासी मोटारींची विक्री १९ टक्क्यांनी वाढून ती ३७,३६१ मोटारींवर गेली आहे. हलक्या व्यावसायिक वाहनांची विक्री ३.२४ टक्क्यांनी वाढून २१,८२९, तर अवजड व्यावसायिक वाहनांची विक्री १२ टक्क्यांनी वाढून १५,५३२ वाहनांवर गेली आहे. निर्यातीमध्ये ३९ टक्क्यांनी वाढून ती ३७,३६१ वाहनांवर गेली आहे. महिंद्र अँड महिंद्रच्या सेडान श्रेणीतील व्हेरिटोची बाजी महिंद्र अँड महिंद्रच्या व्हेरिटो या सेडन प्रकारातील मोटारीला चांगला प्रतिसाद मिळालेला असून अगोदरच्या वर्षातल्या ४५० मोटारींच्या तुलनेत यंदाच्या मे महिन्यात १ हजार २९१ मोटारींची विक्री झाली आहे. कंपनीच्या मोटार निर्यातीत लक्षणीय वाढ झालेली असून ती अगोदरच्या वर्षातल्या १,६०८ मोटारींवरून २,१६४ मोटारींवर गेली आहे. मोटारींची एकूण विक्री २० टक्क्यांनी वाढून ती २८,४८८ वाहनांवरून ३४,३२१३ वाहनांवर गेली आहे. कंपनीच्या स्थानिक बाजारपेठेतील विक्रीमध्ये १९ टक्क्यांनी वाढ होऊन ती अगोदरच्या २७,०३८ मोटारींवरून ३२,१५९ मोटारींवर गेली आहे.Trending