आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जेएलआरला नफ्यात आणण्यात टाटा मोटर्सचा सिंहाचा वाटा

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

या आठवड्याच्या प्रारंभी लँड रोव्हरने नवी रेंज रोव्हर स्पोर्ट गाडी सादर केली. ही लक्झरी प्रकारातील नवी एसयूव्ही (स्पोर्ट्स युटिलिटी व्हेइकल) आहे. या एसयूव्हीने न्यूयॉर्कपासून ते लंडनपर्यंत आणि मुंबईपासून ते शांघायपर्यंत सर्व श्रीमंतांचे लक्ष वेधले. या एसयूव्हीचे पालकत्व असणा-या जग्वार लँड रोव्हर (जेएलआर) कंपनीचा नफा अलीकडे वाढतो आहे.


टाटा मोटर्सने 2008 मध्ये जेएलआर हा ब्रिटनस्थित ब्रँड खरेदी केला होता. त्याआधीची 20 वर्षे या ब्रँडवर फोर्डची मालकी होती. मात्र, फोर्ड या ब्रँडला कधीच नफ्यात आणू शकली नाही. आता प्रश्न असा आहे की टाटाने काय केले आणि फोर्डने काय चुकीचे केले ? टाटाने जेएलआरच्या प्रॉडक्ट प्लॅनवर विश्वास ठेवला आणि त्या व्यवस्थापनाला मोकळे वातावरण दिले. याचाच अर्थ, कंपनीच्या कामकाजात टाटाने विनाकारण ढवळाढवळ केली नाही.


युनिक इन क्लास कारमुळे जग्वार लँड रोव्हरच्या उलाढालीत भर टाकली आहे. याचे उत्तम उदाहरण म्हणजे इव्होकला मिळालेले मोठे यश. ही कॉम्पॅक्ट एसयूव्ही सप्टेंबर 2011 मध्ये बाजारात आली. इव्होकचे खरेदीदार बहुतेक स्पर्धकांच्या ब्रँडचा वापर करत होते. जग्वार-एक्सएफबाबतही असेच चित्र होते.


कंपनीच्या युनिक कारच्या विक्रीत वाढ झाली आहे. इव्होकचे उत्पादन जेथे होते तो जग्वारचा कारखाना 24 तास कार्यरत आहे आणि जेएलआर आता चीनमध्येही कारखाना काढणार आहे. कंपनी आता संशोधन आणि विकास (आर अँड डी) याकडेही लक्ष देत आहे. उत्पादन विकासासाठी जेएलआर सुमारे 225.83 अब्ज रुपये (2.75 अब्ज पौंड) गुंतवणूक करणार आहे. उलाढाल वाढवण्याच्या दृष्टीने या योजनेनुसार कंपनीला 8 नवी इनोव्हेटिव्ह उत्पादने सादर करण्यास मदत होणार आहे. कॉम्पॅक्ट एसयूव्ही इव्होक त्यापैकी एक आहे. नऊ-स्पीड गिअर बॉक्स असणारी ही जगातील एकमेव कार आहे.
फोर्ड जग्वारच्या काळात कंपनी एस-टाइपसारख्या कार बनवत असे. मात्र ही कार ब्रिटनच्या बाजारपेठेसह सर्व स्तरांतील ग्राहकांना आकर्षित करण्यात अयशस्वी ठरली. आता टाटा मोटर्स नेतृत्वाच्या नव्या विचारांमुळे कंपनीला फायदा होत आहे. जेएलआर आता ऑटो उद्योगातील प्रस्थापित ब्रँडची आघाडी सांभाळण्यास सज्ज आहे. लवकरच जेएलआरची एफ टाइप स्पोर्ट्स कार येणार आहे. या श्रेणीतील दिग्गज बीएमडब्ल्यू 3 सिरीजच्या कारला नवी कार टक्कर देईल. तर रेंज रोव्हर स्पोर्ट बीएमडब्ल्यूच्या एक्स -5 शी स्पर्धा करेल. रेंज रोव्हर स्पोर्टला चांगला प्रतिसाद मिळतो आहे.
ऑटोमोटिव्ह रिसर्च अँड डेव्हलपमेंट क्षेत्रात जेएलआर ब्रिटनमधील सर्वात मोठी गुंतवणूकदार आहे. कंपनी 80 टक्के वाहनांची निर्यात करत आहे. गेल्या दोन वर्षांत जेएलआरने निव्वळ निर्यातीतून ब्रिटनच्या अर्थव्यवस्थेत सुमारे 2,053 अब्ज रुपयांची (25 अब्ज पौंड) भर टाकली आहे. युरोपातील सध्याच्या अस्थिर वाजारपेठांत जेएलआरचे भवितव्य उत्तम आहे. याचे सर्व श्रेय टाटा समूहाला द्यायला हवे.


लेखक ब्रिटनस्थित ऑटोमोटिव्ह क्षेत्रातील पत्रकार आहेत.

kabeer.mahajan@dainikbhaskargroup.com