आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

टाटा मोटर्सने सादर केली नवी बोल्ट आणि जेस्ट

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- देशातील सगळ्यात मोठी वाहन निर्माता कंपनी 'टाटा मोटर्स लिमिटेड'ने आज (सोमवार) दोन कार सादर करण्याची घोषणा केली. त्यात नवी हॅचबॅक 'बोल्ट' आणि एंट्री लेव्हल सेडान 'जेस्ट'चा समावेश आहे. पुढील आर्थिक वर्षात दोन्ही कार भारतीय बाजारात उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. त्यानंतर जागतिक बाजारात त्या उतरविल्या जाणार असल्याची माहिती कंपनीचे प्रवासी वाहन शाखेचे अध्यक्ष रंजीत यादव यांनी दिली.

यादव म्हणाले, पुणे कांवेन्ट्री, (ब्रिटन) आणि टुरिनमधील (इटली) डिझाइन स्टूडिओमध्ये या दोन्ही कारचे डिझाइन करण्यात आले आहे. नव्या कारची निर्मिती 'टाटा विस्टा एक्‍स वन'च्या धर्तीवर करण्‍यात वाली आहे.

1.2 लीटर पेट्रोल इंजिनासह (रेव्होट्रोन) एंटी ब्रेक सिस्टिमसोबत (एबीएस) सादर करण्‍यात आली आहे. याशिवाय इंफ्कोटेमेंट सिस्टिम, नवी नेव्हिगेशन अॅण्ड लोकेशन सेवा टच स्क्रीन म्युझिक व्हिडियो आणि ऑडिओ प्रणालीसोबत अनेक अत्याधुनिक सुविधा देण्यात आल्या आहेत.

नव्या कार बाजारात उतरवल्या असल्या तरी इंडिका आणि इंडिगोसारख्या वाहनांचे उत्पादन सुरुच राहणार असल्याचेही यादव यांनी स्पष्ट केले आहे.

पुढील स्लाइड्‍सवर क्लिक करून छायाचित्रातून पाहा; 'टाटा'च्या नव्या बोल्ट आणि जेस्टची झलक