आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

15 सेकंदात शंभरीच्या वेगाने धावेल टाटाची नवी एसयुव्ही, मिळेल 14 चा मायलेज

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

देशातील सर्वात मोठी ऑटोमोबाईल कंपनी टाटा मोटर्सने एसयुव्ही सफारी स्टॉर्मचे न्यू व्हर्जन लॉन्च केले आहे. 10.86 लाख रुपये किंमतीच्या या डिझेल एसयुव्हीमध्ये अत्याधूनिक सुविधा आहेत. सर्वसाधारणपणे लक्झरी कारमध्येच अशा सुविधा पाहायला मिळतात.

टाटा मोटर्सनुसार नवी सफारी स्टॉर्मला कस्टमाइज्ड आऊटडोर इसेंशिअल्स आणि अत्याधूनिक तंत्रज्ञानासह सादर करण्यात आले आहे. त्यासोबतच या कारचे खास वैशिष्टय तीचे पॉवरफूल इंजिन आणि स्पीड असणार आहे. नव्या स्टॉर्मला टाटा मोटर्सने त्यावेळी लॉन्च केले आहे जेव्हा, कंपनी सेल्स वाढवण्याचा जारदार प्रयत्न करीत आहे.

कंपनीने नव्या स्टॉर्म सारख्या सुविधा जून्या सफारीमध्येही देण्याची तयारी दर्शवली आहे. त्यासाठी ग्राहकांना 57 हजार रुपये मोजावे लागणार आहेत.

टाटाची नवी स्टॉर्म महिंद्रा स्कॉर्पिओ आणि रेनॉल्ट डस्टरला टक्कर देणार आहे.