आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Tata Motors Plans To Sell 5000 Units Of Sumo Gold Each Month ‎

टाटा विकणार महिन्याला पाच हजार सुमो गोल्ड

11 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

चेन्नई - आगामी दोन महिन्यांत प्रतिमाह 5000 सुमो गोल्डची विक्री करण्याची टाटा मोटार्सची योजना आहे. याबाबत अधिक माहिती देताना कंपनीचे युटिलिटी मोटार विभागाचे हेड आशिष धर यांनी सांगितले की, नव्या सुमो गोल्डची किमत आम्ही 40,000 रुपयांनी कमी केली आहे. यात सीआर-4 इंजिन असून त्यामुळे प्रतिलिटर 14.3 मायलेज मिळते. चांगल्या पिक-अपसाठी 85 पीएचपी पॉवरसह अनेक नवे फीचर्स यात आहेत. सध्या प्रतिमाह 3000 सुमोची विक्री होते. चार महिन्यांपूर्वी हा आकडा 1100 होता. आता आम्ही महिन्याकाठी 5000 सुमो विक्रीचे उद्दिष्ट ठेवले आहे. भारत स्टेज थ्री व्हर्जन असणा-या सुमो गोल्डची ंिकंमत 5.47 लाख ते 6.89 लाख रुपये आहे (एक्स-शोरूम चेन्नई).