आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Tata Motors Shareholders Reject Proposals Executive Pay

टाटा मोटर्सच्या कार्यकारी संचालकांची पगारवाढ फेटाळली

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - देशातील सर्वात मोठी ऑटोमोबाइल कंपनी टाटा मोटर्सच्या व्यवस्थापनाला समभागधारकांनी जोरदार झटका दिला आहे. कंपनीने आपल्या दोन कार्यकारी संचालकांच्या वेतनवाढीचा प्रस्ताव समभागधारकांसमोर मांडला होता. समभागधारकांनी हा प्रस्ताव फेटाळला. या प्रस्तावाविरोधात मत देणार्‍यांत संस्थात्मक गुंतवणूकदारही मोठ्या प्रमाणात आहेत. या पगारवाढीमुळे कंपनीच्या नफ्यावर परिणाम होण्याच्या शक्यतेने समभागधारकांनी विरोध दर्शवला.
टाटा मोटर्सने कंपनीच्या व्यावसायिक वाहन विभागाचे कार्यकारी संचालक रवींद्र पिशोरदी आणि गुणवत्ता विभागाचे कार्यकारी संचालक सतीश बोरवणकर यांच्या पगारवाढीचा प्रस्ताव मांडला होता. कंपनी तोट्यात असतानाही आगामी तीन वर्षांसाठी या दोघांच्या किमान वेतनाची निश्चिती करण्यात येत होती. तसेच मागील दोन वर्षांत या दोघांना देण्यात आलेल्या अतिरिक्त रकमेबाबत कंपनीने समभागधारकांकडून मंजुरी मागितली होती.

(फोटो - संग्रहित छायाचित्र)