आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

टाटा नॅनोचे सीएनजी मॉडेल लॉन्च; किंमतही आवाक्यात!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- सर्वसामन्यांना परवडेल अशा 'टाटा नॅनो'चे सीएनजी मॉडेल लॉन्च झाली आहे. नॅनोने सर्वसामान्यांचे कार घेण्याचे स्वप्न पूर्ण केले असले तरी अलीकडच्या काळात टाटा नॅनोची लोकप्रियता आणि मागणी ओसरू लागली आहे. त्यामुळे टाटा मोटर्सने एक नामी शक्कल लढविली आहे. यापूर्वी 'क्रेडीट कार्ड वापरा आणि नॅनो चालवा' अशी शक्कल लढविली होती.

'टाटा नॅनो सीएनजी ईमॅक्स' असे या मॉडेलचे नाव असून 2.52 लाख रुपया कारची किंमत ठेवण्यात आली आहे. ईमॅक्स ही पेट्रोल तसेच सीएनजीवरही चालवता येणार आहे. मात्र ज्या राज्या सीएनसी गॅसचा पुरवठा केला जातो, अशाच राज्यात नॅनोचे ईमॅक्स मॉडेल उपलब्ध होणार आहेत. दिल्ली, गुजरात, महाराष्ट्र आणि लखनऊमध्ये उपलब्ध होणार आहे.

नॅनो एलएक्सची किंमत 2.77 लाख रुपये असून यात सीएनजी सिलिंडर फ्रंट सीट्स खाली फिट करण्यात आले आहे. या कारमध्ये सेफ्टीच्या पार्श्वभूमीवर 'लीक डिटेक्शन सेंसर्स' आणि 'इंटरलॉक सेंसर्स'ही देण्यात आले आहेत.

पुढील स्लाईड्‍सवर क्लिक करून पाहा टाटा नॅनोचे बदलते रुप...