मुंबई- 'गरीबांची कार' अशी ओळख बनवणारी टाटा कंपनीची 'नॅनो' कार महागणार आहे. नॅनोची किंमत वाढवून तोटा भरून काढण्यासाठी टाटा कंपनीने हे नवे पाऊल उचलले आहे.
नव्या नॅनोची किंमत 1.75 ते 3.25 लाखादरम्यान असण्याची शक्यता आहे. गेल्या चार वर्षांत कंपनीने 2,42,431 नॅनो कार्सची विक्री केली होती. परंतु, टाटा कंपनीने 2009 साली नॅनो लॉन्च केली तेव्हा 2,50,000 कार विक्रीचे लक्ष ठेवले होते.
येत्या एक-दीड वर्षांत प्रति महिना दहा हजार कार विक्रीचे लक्ष टाटा कंपनीने ठेवले आहे. यासाठी नॅनो कारच्या मार्केटिंगमध्येही बदल करण्यात आले असल्याचे कंपनीच्या सूत्रांनी सांगितले.