आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Tata Nano To Be Souped Up, Positioned As Smart City Car: Cyrus Mistry

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

नॅनो लवकरच येणार स्मार्ट सिटी कारच्या रुपात

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- मध्यमवर्गीयांची स्वप्नपूर्ती करणारी कार अशी ओळख असलेल्या टाटा नॅनो कारच्या विक्रीला मागील सहामाहीत चांगलाच ब्रेक लागला आहे. हा ब्रेक काढून नॅनोच्या विक्रीला वेग देण्यासाठी टाटा मोटर्सने कंबर कसली आहे. नॅनोला आता स्मार्ट सिटी कारच्या रूपात नव्याने बाजारात आणण्याची तयारी टाटाने सुरू केली आहे.

घटत्या विक्रीच्या वळणावरून नॅनोला सहीसलामत पुढे काढण्यासाठी टाटा मोटर्स आता नॅनोला बजेट कारऐवजी एक स्मार्ट सिटी कारच्या रूपात नव्या ढंगात सादर करणार आहे. नूतनीकरण योजनेत नॅनोला पॉवर स्टेअरिंग बसणार असून तिची सीएनजी आवृत्तीही सादर होणार आहे. टाटा समूहाचे अध्यक्ष सायरस पी. मिस्त्री यांनी समभागधारकांच्या वार्षिक सभेत सांगितले की, नॅनोला स्मार्ट सिटी कारचे रूप देण्याची योजना आहे. त्यानुसार अनेक फीचर्स वाढवण्यावर लक्ष देण्यात येणार आहे.

नॅनो बाजारात प्रथम सादर झाली तेव्हा तिची किंमत एक लाख रुपये होती. मोटारसायकल आणि स्कूटर चालवणारा ग्राहक वर्ग नॅनोला प्राधान्य देईल, असा कंपनीचा अंदाज होता. मात्र, मार्च 2013 पर्यंत नॅनोची विक्री 27 टक्क्यांनी घसरली. टाटाचे माजी अध्यक्ष रतन टाटा यांनीही नॅनो प्रभाव पाडण्यात अयशस्वी ठरल्याचे मान्य केले. ग्राहकांना नॅनोकडे आकर्षित करण्यासाठी टाटा मोटर्सने अनेक प्रकारच्या आकर्षक योजना सादर केल्या. मात्र, नॅनोच्या विक्रीचा टॉप गिअर काही पडला नाही. कंपनीच्या गुजरातेतील साणंद येथील प्रकल्पात सध्या नॅनोचे उत्पादन निम्म्यावर आले आहे.

मायलेज वाढवण्यावर भर : सायरस मिस्त्री
नव्या रूपातील नॅनोला पॉवर स्टेअरिंगचा आधार देण्यात येणार असल्याचे मिस्त्री यांनी स्पष्ट केले. नव्या रूपाच्या वेळी नॅनोच्या अंतर्गत तसेच बाह्य रूपाला आणखी खुलवण्यात येणार आहे. तसेच नॅनोची इंधन कार्यक्षमता (मायलेज) वाढवण्यावर विशेष लक्ष देण्यात येणार आहे. कंपनी नॅनोचे सीएनजी व्हर्जन सादर करणार असल्याचे मिस्त्री यांनी स्पष्ट केले.