आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

टाटा नॅनोच्या शिरपेचात विश्वासार्ह ब्रँडचा तुरा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - सर्वसामान्यांना परवडणारी स्वस्त मोटार म्हणून ओळखल्या जाणा-या ‘टाटा नॅनो’ हा चारचाकी वाहनांमधील सर्वात विश्वासार्ह ब्रॅँड असल्याचे ‘ ब्रॅँड ट्रस्ट’ने जाहीर केले आहे. ट्रस्ट रिसर्च अ‍ॅडव्हायझरीने विविध प्रकारच्या 211 गटांमधून केलेल्या 1100 देशांतील सर्वात विश्वसनीय ब्रँडच्या सर्वेक्षणामध्ये ‘नॅनो’ने आपल्या शिरपेचात हा अभिमानाचा तुरा खोवला आहे.

ट्रस्ट रिसर्च अ‍ॅडव्हायझरीचा ‘ब्रॅँड ट्रस्ट रिपोर्ट अहवाल’ हा 16 शहरांमध्ये सर्वेक्षण करून तयार करण्यात आला आहे. या अहवालात देशातल्या 211 गटांतील 1100 विश्वसनीय ब्रॅँड्सची यादी देण्यात आली आहे. सर्वसामान्यांना परवडणारी आणि अवघ्या एक लाख रुपयात चारचाकी आणण्याची घोषणा टाटा मोटर्सने केल्यापासून ‘नॅनो’बद्दल जगभरात कुतूहल निर्माण झाले होते आणि अपेक्षाही उंचावल्या होत्या. चारचाकीसाठी भारतीय रस्त्यांची स्थिती ओळखून केलेल्या सर्व सुरक्षा चाचण्यापांसून ही मोटार खरोखरच ग्राहकांना परवडणारी कशी ठरेल याबाबत टाटा मोटर्स कसोशीने प्रयत्न करीत होती, पण त्याचबरोबर ग्राहकांना तब्बल 4 वर्षे / 60 हजार किलोमीटरची वॉरंटी देखील दिली. या सगळ्या प्रयत्नांमुळेच नॅनोने लाखो ग्राहकांचा विश्वास जिंकला.


आर्ट इन मोशन संकल्पना
आर्ट इन मोशन आणि एमटीव्हीबरोबर नॅनो ड्राइव्हसारख्या अनोख्या संकल्पना राबवून देखील नॅनोने आपल्याकडे ग्राहकांचे लक्ष खिळवून ठेवले. ग्राहकांकडून मिळणारा प्रतिसाद लक्षात घेऊन अलीकडेच टाटा नॅनोने ‘नॅनो स्पेशल एडिशन’ ही अ‍ॅलॉय व्हिल्स, ग्लोव्ह बॉक्स, म्युझिक सिस्टिम, डिझायनर डिकॅल्ससारख्या आणखी विशेष सुविधा असलेली नवीन नॅनो बाजारात आणली. विशेष म्हणजे त्यासाठी कोणताही अतिरिक्त खर्च आकारला नाही. नॅनो अधिक चांगल्या आणि देखण्या रूपात ग्राहकांपर्यंत पोहोचवण्याच्या या प्रयत्नामुळेच टाटा नॅनोला आपल्या लाखो चाहत्यांच्या मनात विश्वासार्ह ब्रँड म्हणून नाव कोरता आले.