आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Tata Power To Set Up Solar Power Plant In Satara

टाटा पॉवरचा सातार्‍याजवळ सौरऊर्जा प्रकल्प

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- एकात्मिक वीजनिर्मितीत आघाडीवर असलेल्या टाटा पॉवरच्या संपूर्णत: मालकी असलेल्या टाटा पॉवर रिन्युएबल एनर्जी लिमिटेड या कंपनीने सातारा जिल्ह्यात 28.8 मेगावॅट क्षमतेचा सौरऊर्जा प्रकल्प उभारत आहे.
फोटोव्होल्टाइक तंत्रज्ञानावर उभारण्यात येणारा हा सर्वात मोठा प्रकल्प असून तो पळसवाडी येथे 130 एकरपेक्षा जास्त जागेवर उभारण्यात येणार आहे. टाटा पॉवर डिस्ट्रीब्युशनने या सौरऊर्जा प्रकल्पातून वीज खरेदीसाठी 25 वर्षांचा वीजखरेदी करार केला आहे.

या प्रकल्पात निर्माण करण्यात येणारी वीज महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनीच्या जाळ्यामार्फत इतरत्र पोहोचवण्यात येणार आहे. हा प्रकल्प संपूर्ण क्षमतेसह यंदाच्या डिसेंबरपासून सुरू होण्याचा अंदाज आहे. एकूण वीजनिर्मिती क्षमतेपैकी 20 ते 25 टक्के हिस्सा पर्यावरणस्नेही, शुद्ध ऊर्जास्त्रोतांचा असावा यासाठी कंपनी प्रयत्नशील असल्याचे कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक अनिल सारदाना यांनी सांगितले. फोटोव्होल्टाइक तंत्रज्ञानावरचा हा सर्वात मोठा प्रकल्प आहे.