(TATA Zest)
सध्या सणउत्सवाचे दिवस आहेत. सर्वत्र आनंदी आनंद सुरू आहे. तसेच अनेक जण या दिवसांमध्ये नवनवीन वस्तू घेण्यास उत्सूक असतात. हीच बाब हेरून अनेक कार कंपन्यांनी आपापले नवे कार मॉडेल लॉन्च करण्याची तयारी सुरू केली आहे. त्यात जुलाईच्या शेवटी हॉन्डा कंपनीने मोबिलियो आणि मर्सिडिजने लक्झरी बेंझ सीएलएक्लासचे जोरदार लॉन्चिंग केले. त्यामुळे आता टाटानेही आपली सेदान कार ZEST हे मॉडेल बाजारात आणण्याची तयारी सुरू केली आहे.
TATA Zest
अंदाजे किंमत - 4.50 ते 7.60 लाखापर्यंत
लॉन्च - ऑगस्ट
भारतातील सर्वात मोठा ऑटोमोबाईल समुह टाटा यंदा त्यांची पहिली ऑटोमेटेड मॅन्यूअल ट्रान्समिशन टेक्नॉलॉजी असलेली सेडान कार झेस्ट या ऑगस्टमध्ये लॉन्च करणार आहे. ही कार मागील चार वर्षांमध्ये लॉन्च झालेली पहिली प्रवासी कार असेल. मार्केटमधील पडलेल्या शेअर्सना पुन्हा मिळवणे हा या कारच्या लॉन्चींग मागचा टाटासमुहाचा उद्देश आहे. तसेच घरगुती व्यवसायात टाटाला जो तोटा झाला आहे, तो कंपनी भरून काढण्याच्या प्रयत्नात आहे. मात्र सध्याच्या अर्थव्यवस्थेतील मंदीला लक्षात घेता हे उद्दीष्ट पुर्ण करणे अवघड दिसत आहे. टाटा झेस्टची लॉन्चींगची तारीख अजून ठरलेली नाही. मात्र कंपनीने या कारच्या टेस्ट ड्राईव्ह आणि कॉन्टेस्ट वेबसाईटच्या माध्यमातून सुरू केले आहेत. या कारचे प्रतिस्पर्धी
मारूती सुझूकी डिझायर, शोरलेट सेल सेदान,
होंडा अमेझ आणि फॉक्सवॅगन वेंटो हे असून शकतात.
पुढील स्लाईडमध्ये जाणून घ्या, या कारच्या इंटेरीअरबद्दल