आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

झेस्ट व बोल्ट: वर्षखेरीस टाटाच्या दोन आरामदायक कार बाजारात

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

टाटा झेस्ट सब-फोर-मीटर सेलून आणि बोल्ट हॅचबॅक या दोन कार व्हिस्टाच्या एक्स वन धर्तीवर बनवण्यात आल्या आहेत. व्हिस्टापेक्षा वेगळ्या दिसण्यासाठी यांच्या शीटमेटलमध्ये बदल करण्यात आला आहे. यांचा लूक स्पोर्टी करण्यात आलाय. फ्रंट बंपर, ग्रिल, हेडलॅम्प्स, बोनट आकर्षक आहेत. झेस्ट आणि बोल्टमध्ये फरक आहे. झेस्टमध्ये एलईडी डेटाइल रनिंग लॅम्प्स आहेत. ग्रिलच्या आजूबाजूला अतिरिक्त क्रोम स्ट्रिप्स दिल्या गेल्या आहेत. बोल्टमध्ये हेडलॅम्प्सचा आतला भाग काळा करण्यात आला आहे.

दोन्ही कारमध्ये व्हिज्युअल बल्क कमी करण्यासाठी खालच्या बाजूने थिक कॅरेक्टर लाइन देण्यात आली आहे. झेस्टच्या बंपरखाली आणि रनिंग बोर्डवर मजेदार काळी स्ट्रिप देण्यात आली आहे. यात बूट आकर्षक आहे, परंतु बाकी डिझाइनशी त्याचा ताळमेळ बसत नाही. यात 16 इंचांची चाके आहेत. त्यामुळे बोटांवर उभारल्यासारखा त्याचा लूक दिसतो. असे म्हणण्यात येते की, टाटाने झेस्टबाबत तीच चूक केली, जी सफारी स्टॉर्मबाबत केली होती. आकाराने बोल्ट व्हिस्टाप्रमाणेच लांब-रुंद आहे. लांब फ्रंट ओव्हरहँगमुळे तिची लांबी 30 मिमी जास्त आहे. झेस्ट मात्र 3995 मिमी लांब असल्याने एक छोटी कार आहे. दोन्ही कारचे व्हीलबेस व्हिस्टाप्रमाणेच 2470 मिमींचे आहेत, मात्र ट्रेक रुंद आहे.

मोकळे अन् ऐसपैस इंटेरिअर
दोन्ही डॅशबोर्ड संपूर्ण नव्या धाटणीचे आहेत. यामुळे फिनिशिंग सुधारले आहे. असे डिझाइन आणि दर्जा टाटाच्या अन्य कारमध्ये पूर्वी कधी दिसून आला नाही. त्या सर्व भागांवर लक्ष देण्यात आले आहे, ज्याला आपण स्पर्श करतो वा सोयीने सेट करत असतो. व्हिस्टाप्रमाणेच हेडलाइट्स, वायपर स्ट्रोक आणि डोअर पॅड्स आहेत. बोल्टचे इंटेरिअर फीचर्स स्पोर्टी थीमचे आहेत. याशिवाय झेस्ट व बोल्टमध्ये डील पेडल नाहीत. मोठे एअरकंडिशनिंग युनिट, जे सेंट्रल कन्सोलच्या मागे असते आणि ड्राइव्हच्या फु टवेलच्या जागेला कमी करते. फ्रंट सीट््स फार चांगली आहे. साइड बोल्डर्स, सीट बेस बोल्स्टर्स आणि कु शनिंगला वाढवण्यासाठी टाटाच्या अभियंत्यांनी भरपूर परिश्रम घेतले आहेत. मागच्या सीटही आरामदायक आहेत. पूर्वीपेक्षा जास्त प्रशस्त आहेत. झेस्टचे 360 लिटरचे बूट अ‍ॅमेझच्या 400 लिटरच्या तुलनेत छोटे आहे. याला योग्य आधारही दिला गेलेला नाही. लगेजच्या जागेत सस्पेन्शनची अनावश्यक अडचण होते. दोन्ही कारमध्ये प्रोजेक्टर लॅम्प, टचस्क्रीन इन्फोटेन्मेंट सिस्टिम, व्हॉइस कंट्रोल व नेव्हिगेशनसारख्या सुविधा आहेत. ब्ल्यूटूथ, एसडी कार्ड रीडर, पॉवर विंडोज, पॉवर मिरर्स दिले गेले आहेत.

चेसिसचे आव्हान
चेसिसचा उद्देश आवाज व व्हायब्रेशन कमी करण्याचा असतो. स्टिअरिंग व्हीलला झटक्यांपासून वाचवण्यासाठी नव्या सब फ्रेमवर नवी स्टिअरिंग रेक लावण्यात आली आहे. व्हिस्टाच्या हायड्रोलिक पॉवर स्टिअरिंगच्या जागी झेडएफ-डिझाइन इलेक्ट्रिकली असिस्टेड पॉवर स्टिअरिंग दिले गेले आहे. हायड्रोलिक पॉवर स्टिअरिंगच्या तुलनेत हे हलके आहे. केबिन व्हायब्रेशनपासून वाचवण्यासाठी इंजिनमधील बुशेशची संख्या वाढवण्यात आली आहे. यामुळे 3.5 किलो वजन कमी करणे शक्य झाले आहे. याशिवाय डुडल-पाथ फ्रंट स्ट्रुट््समध्येही बदल करण्यात आले आहेत.

दोन्ही कार पॉवर पॅक
बोल्ट आणि झेस्टमध्ये नवे रेवोट्रॉन इंजिन आहे. यात 1.2 लिटर टर्बोचार्ज्ड, मल्टिपॉइंट फ्युएल-इंजेक्टेड पेट्रोल मोटर आहे, जी 84 बीएचपी पॉवर देते. इंजिनचा मुख्य फोकस इंधनाची बचत , कमी आवाज आहे. डिझेल इंजिन फिएट लायसेन्स्ड 1.3 लिटर मल्टिजेट टेस्टेड आहे. चेसिसमध्ये बदल केल्याने वजन 50 किलोने कमी आहे. बोल्टमध्ये फिक्स्ड जॉमेट्रीसह मल्टिजेट इंजिन आहे, जे 74 बीएचपी पॉवर देते. व्हेरीएबल जॉमेट्री टर्बो इंजिन आहे, ज्यातून 89 बीएचपी पॉवर मिळेल. झेस्ट डिझेलमध्ये ऑटोमेटेड मॅन्युअल ट्रान्समिशन (एएमटी) बॉक्स असेल.

टाटा बोल्ट
कधी येणार : 2014 वर्षअखेरीस
कर्ब वेट : 1080 किलो
बूट/इंधन टँक : 232 लिटर /44 लिटर
इंजिन : 4 सिलिंडर, 1.2 लिटर, टर्बो-पेट्रो /4 सिलिंडर, 1.3 लिटर, टर्बो-डिझेल
पॉवर : 84 बीएचपी 5000 आरपीएमवर 74 बीएचपी 4000 आरपीएमवर

टाटा झेस्ट
केव्हा येणार : 2014 च्या अखेरीस
कर्ब वेट: 1106 किलो
बूट/इंधन टँक :360 लिटर / 44 लिटर
इंजिन:4 सिलिंडर, 1.2 लिटर, टर्बो-पेट्रो: 4 सिंलिडर, 1.3 लिटर, टर्बो-डिझेल
पॉवर : 84 बीएचपी 5000 आरपीएम वर/ 89 बीएचपी 4000 आरपीएमवर
गिअर बॉक्स : 5 स्पीड, मॅन्युअल