आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Tata's Airline Service Come Into Reality After 18 October

‘टाटां’च्या विमानसेवा करारावर 18 ऑक्टोबरला होणार शिक्कामोर्तब

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - टाटा सन्स आणि सिंगापूर एअरलाईन्स यांच्या संयुक्त सहकार्यातून सुरू होत असलेल्या विमानसेवेच्या प्रस्तावावर 18 ऑक्टोबरला होत असलेल्या विदेश गुंतवणूक प्रोत्साहन मंडळाच्या बैठकीत विचार होणार आहे. या विमानसेवेला सरकारकडून मंजुरी मिळेल अशी आशा टाटा सन्सने व्यक्त केली आहे.


टाटा सन्सचे अधिकारी मुकुंद राजन या संदर्भात म्हणाले की टाटा सन्स - सिंगापूर एअरलाईन्स ची विमान सेवा मंजुरी प्रक्रिया नैसर्गिकरित्या होणार आहे. या प्रस्तावाला सरकारकडून मंजुरी मिळेल अशी अपेक्षा आहे. आर्थिक व्यवहार खात्याचे सचिव अरविंद मायाराम यांच्याबरोबर झालेल्या बैठकीनंतर त्यांनी ही माहिती दिली.
टाटा सन्स आणि सिंगापूर एअरलाईन्स यांच्या संयुक्त सहकार्यातून 49 दशलक्ष डॉलरची विदेशी थेट गुंतवणूक होणार आहे. या प्रस्तावावर विदेश गुंतवणूक प्रोत्साहन मंडळाच्या 18 ऑक्टोबरला होत असलेल्या बैठकीत चर्चा करण्यात येणार आहे.


त्याचबरोबर डीजीसीए, कर खाते आणि अन्य मंत्रालय
खात्यांकडूनही कंपनीला आवश्यक त्या मंजु-या घ्याव्या लागणार आहेत. परंतु या प्रस्तावित संयुक्त सहकार्याबाबत सरकारने देखील सहाय्य करण्याची भूमिका कायम ठेवली आहे.


100 दशलक्ष डॉलरची गुंतवणूक
या संयुक्त सहकार्यातील कंपनी ‘टाटा एसआयए एअरलाईन्स लि’ म्हणून ओळखण्यात येणार असून टाटा सन्सचे यात सर्वाधिक 51 टक्के तर सिंगापूर एअरलाईन्सचे 49 टक्के भागभांडवल असेल. या दोन्ही कंपन्या या विमानसेवेसाठी 100 दशलक्ष डॉलरची गुंतवणूक करणार आहेत. भारतामध्ये स्वस्त विमान सुरू करण्यासाठी टाटा समुहाने एअर एशिया या कंपनीबरोबर अगोदरच करार केला आहे.