आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

करमुक्त रोखे विक्रीची 13 कंपन्यांना परवानगी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - एनटीपीसी, एनएचबी आणि हुडको यांच्यासह सार्वजनिक क्षेत्रातील 13 संस्थांना करमुक्त रोख्यांच्या माध्यमातून 48 हजार कोटी रुपयांचा निधी उभारण्यासाठी परवानगी दिली आहे. दीर्घकालीन पायाभूत प्रकल्पांच्या वित्तपुरवठय़ाला बळकटी यावी यासाठी केंद्र सरकारने हा निर्णय घेतला आहे.

या रोखे विक्रीचा कालावधी 10, 15 किंवा 20 वर्षांचा असेल. किरकोळ गुंतवणूकदार, पात्र संस्थात्मक खरेदीदार, कंपन्या, र्शीमंती व्यक्ती आदींना हे रोखे खरेदी करता येऊ शकतील, असे केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. नॅशनल हायवे ऑथोरिटी ऑफ इंडिया, रुरल इलेक्ट्रिफिकेशन कॉर्पोरेशन, पॉवर फायनान्स कॉर्प, हाउसिंग अँड अर्बन डेव्हलपमेंट कॉर्प या कंपन्यांना चालू आर्थिक वर्षात प्रत्येकी पाच हजार कोटी रुपयांपर्यंत निधी उभारण्याची परवानगी देण्यात आली आहे.

एन्नॉर पोर्ट आणि एअरपोर्ट ऑथोरिटी ऑफ इंडिया या कंपन्या प्रत्येकी 500 कोटी रुपयांपर्यंतच अशा प्रकारचे रोखे विकू शकतात, तर कोचीन शिपयार्ड 250 कोटी रुपयांपर्यंत रोखे उभारणी करू शकते. रोखे विक्रीचा 40 टक्के भाग किरकोळ गुंतवणूकदारांसाठी राखून ठेवणे बंधनकारक असेल.