आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ईएलएसएस : कर बचतीतून उत्तम परतावा देणारा चांगला पर्याय

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - सध्या सर्वच पगारदारांमध्ये करबचतीची चर्चा सुरू आहे. त्यामुळे पगारदार सध्या कर बचतीच्या विविध पर्यायांचा आधार घेत प्राप्तिकरात बचतीचा विचार करत आहेत. प्राप्तिकर कायद्याच्या 80 सी कलमांतर्गत आयुर्विमा, सार्वजनिक भविष्यनिर्वाह निधी (पीपीएफ), कर्मचारी निर्वाह निधी, इक्विटी लिंक्ड सेव्हिंग स्कीम (ईएलएसएस), करबचत मुदत ठेवी, एनपीएस आदींतील एक लाख रुपयांपर्यंतची रक्कम करमुक्त ठरते.
या सर्व बचतीशी निगडित योजना आहेत आणि सर्वसामान्यांत या लोकप्रिय आहेत. दीर्घ काळाचा विचार केल्यास यातील ईएलएसएस
योजना चांगल्या आहेत. जोखमीची तयारी असणाºया गुंतवणूकदारांसाठी कर बचत करणारा ईएलएसएस हा उत्तम पर्याय आहे. मुंबईस्थित ट्रान्सेड कन्सल्टिंगचे संस्थापक आणि सर्टिफाइड फायन्शियल प्लॅनर कार्तिक जव्हेरी यांनी सांगितले की, ईएलएसएस याजनेतील निधी समभागांत गुंतवला जातो. त्यामुळे यात जोखीम अधिक असते. जोखीम पत्करण्याची तयारी नसलेले गुंतवणूकदार पीपीएफ, एनपीएस यात
गुंतवणूक करू शकतात.
प्राप्तिकरामध्ये बचतीबाबत जे पर्याय उपलब्ध आहेत, त्यात ईएलएसएस सर्वात कमी म्हणजे तीन वर्षे मुदतीची (लॉक-इन) योजना आहे. मात्र, याचा अर्थात केवळ तीन वर्षेच गुंतवणूक करता येते असा नव्हे, असे सांगून जव्हेरी म्हणाले की, इक्विटी फंडात किमान पाच वर्षांच्या उद्देशाने गुंतवणूक केली पाहिजे. सर्वसामान्यपणे पाच वर्षांत बाजाराचे
एक चक्र पूर्ण होते.
चांगला फंड कसा निवडाल
सध्या ईएलएसएसच्या विविध 40 योजना बाजारात आहेत. यापैकी ज्या योजनांचा इतिहास (ट्रक रेकॉर्ड) चांगला आहे. त्यात गुतंवणुकीला प्राधान्य द्यावे. यासंदर्भात फंडस इंडिया डॉट कॉमचे संचालक श्रीकांत मीनाक्षी म्हणाले की, बाजारातील तेजी-मंदी तसेच मोठे चढ-उतार अशा विविध चक्रातून तावून सलाखून निघालेल्या ज्या फंडाने चांगला परतावा दिला आहे, असा फंड गुंतवणुकीसाठी निवडावा.
सध्या कर बचतीचा हंगाम सुरू आहे. या वेळी अनेक फंड ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी चांगल्या लाभांशाची घोषणा करतात, या आमिषात न अडकता वृद्धी पर्यायाची निवड करावी. मीनाक्षी यांच्या मते प्रत्येक गुंतवणूकदाराच्या पोर्ट फोलिओमध्ये जास्तीत जास्त दोन कर
बचत फंड असावेत.
साधारणत: ईएलएसएसचा परतावा लाभांशाद्वारे मिळतो त्यामुळे त्यावर कर लागत नाही. दीर्घकालीन परतावा करमुक्त असल्याने मुद्दलीवर मिळमारा लाभही करमुक्त असतो.
ईएलएसएसमध्ये गुंतवणूक कशी करावी
ईएलएसएसमध्ये गुंतवणुकीचे अनेक मार्ग आहेत पारंपरिक पद्धतीने म्युच्युअल फंड एजंटाच्या माध्यमातून गुंतवणूक करता येते. डी-मॅट खातेधारक थेट गुंतवणूक करू शकतो. विविध अ‍ॅसेट मॅनेजमेंट कंपन्यांनी आपल्या संकेतस्थळावरून गुंतवणुकीची सुविधा दिली आहे. गुंतवणुकीपूर्वी नो युवर कस्टमर (केवायसी) फॉर्म भरून देणे सोयीस्कर ठरते.
चांगली कामगिरी करणारे काही ईएलएसएस फंडपरतावा (%)
फंडाचे नाव 1 वर्ष 3 वर्षे 5 वर्षे
कॅनरा रोबेको टॅक्स सेव्हर - 9.41 28.61 11.46
टॉरस टॅक्स शिल्ड -14.08 24.65 10.48
सहारा टॅक्स गेन -12.13 25.48 8.95
रेलिगेअर टॅक्स प्लॅन -9.72 25.33 8.87
फेडिलिटी टॅक्स अ‍ॅडव्हान्टेज -12.11 26.60 8.57
फ्रँकलिन इंडिया टॅक्स शिल्ड -6.48 26.26 8.34
एचडीएफसी टॅक्स सेव्हर -12.95 28.64 6.12
आयसीआयसीआय प्रू टॅक्स -12.36 31.05 5.16