आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आयुर्विमा : आर्थिक सुरक्षिततेतून करबचत

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - डिसेंबर ते मार्च हा काळ करबचतीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. याच काळात करदाते करबचतीच्या योग्य पर्यायाच्या शोधात असतात. आयुर्विमा हा करबचतीचा एक सोपा आणि पारंपरिक पर्याय आहे.
आयुर्विम्याच्या अनेक योजना आहेत. जसे युनिट लिंक्ड योजना (युलिप), एंडॉव्हमेंट योजना, पेन्शन योजना, चाइल्ड प्लॅन, आरोग्य विमा आदींचा यात समावेश होतो. आयुर्विमा योजनेतील प्रीमियमवर प्राप्तिकर कायद्याच्या कलम 80 सी अंतर्गत करबचतीचा लाभ मिळतो, तर आरोग्य विम्याबाबत कलम 80 डी अंतर्गत करबचतीत सूट मिळते. चंदीगडस्थित मार्व्हल इन्व्हेस्टमेंटचे प्रमाणित फायनान्शियल प्लॅनर मणिकरन सिंघल यांनी सांगितले की, आर्थिक सुरक्षिततेसाठी विमा उतरायचा असेल तर टर्म इन्शुरन्स हा उत्तम पर्याय आहे. मात्र, एखाद्याकडे पूर्वीपासूनच विमा असेल तर त्याने युलिपचा पर्याय निवडण्यास हरकत नाही. मात्र यासाठी दीर्घकाळ गुंतवणुकीचे उद्दिष्ट असावे. करबचतीच्या दृष्टीने आयुर्विमा घेत असाल तर प्रस्तावित प्रत्यक्ष कर प्रणालीचा (डायरेक्ट टॅक्स कोड - डीटीएस) विचार करावा. डीटीएस लागू झाल्यासही ही गुंतवणूक करबचतीच्या दृष्टीने लाभदायी ठरेल. डीटीएसनुसार 80 सी कलमानुसार (प्रीमियमचा भरणा) आणि मुदतीनंतर मिळणाºया रकमेवर कलम 10 डी अंतर्गत सूट मिळवण्यासाठी विम्याची रक्क्म प्रीमियमच्या 20 पट असावी, हे लक्षात घ्यावे. करबचत इच्छुकांनी आपल्या गरजेनुसार विचारपूर्वक गुंतवणूक करावी. युलिपमध्ये गुंतवणूक करताना 15 ते 20 वर्षांचे उद्दिष्ट टेवावे. युलिपचा लॉक इन अवधी 5 वर्षे आहे.
पेन्शन योजना : प्राप्तिकरात बचत करण्याचा पेन्शन योजना हा एक चांगला पर्याय आहे. प्राप्तिकरतज्ज्ञ सुभाष जखोटिया यांच्या मते, पेन्शन योजनेच्या प्रीमियमला 80 सी अंतर्गत करातून सूट मिळते. यातून काढण्यात येणाºया रकमेवर मात्र कर लागतो हे लक्षात घ्यावे.

आरोग्य विमा : 80 डीची सवलत
वैद्यकीय खर्चात झालेली वाढ पाहता आरोग्य विमा आता आवश्यक ठरत आहे. सिंघल यांच्या मते, स्वत:साठी तसेच कुटुंबातील सदस्यांसाठी आरोग्य विमा पॉलिसी घेतल्यास कलम 80 डी अंतर्गत प्राप्तिकरात सूट मिळते. आयुर्विमा असला तरी आरोग्य विमा घेतला पाहिजे, असे सांगत ते म्हणाले की, आई-वडिलांसाठी घेण्यात आलेल्या आरोग्य विम्याच्या प्रीमियमपोटी 20,000 रुपयांपर्यंत प्राप्तिकरात सवलत मिळते.