नुकतेच केंद्र सरकारने विदेशात काळा पैसा असलेल्या 18 जणांची यादी जारी केली आहे. काळ्या पैशावर कोणत्याही प्रकारचे कर आकारले जात नाही. आता प्रश्न निर्माण होतो,अद्यापपर्यंत विदेशातील काळापैसा का जमा करण्यात येत नाही. का विदेशात पैशांवर कोणत्याही प्रकारचे टॅक्स लागत नाही? भारतासारख्या देशात प्राप्तकर हा सर्वात मोठे उत्पन्नाचे स्त्रोत आहे. दुसरीकडे जगात अशीही देश आहेत, जिथे लोकांना प्राप्तकर भरावा लागत नाही. त्या राष्ट्रांना टॅक्स हेव्हन कंट्री असे ओळखले जाते.याबाबत वाचून आपल्याकडील टॅक्स देणा-या नागरिकाला टॅक्स हेव्हन कंट्रीचा निवासी होण्यास आवडले असते.
चला तर या देशांविषयी जाणून घेऊ जिथे 1 कोटी रूपये पगारावर एक रूपयाही कर लागत नाही...
1. संयुक्त अरब अमीरात
येथे वैयक्तिक उत्पन्नास गाह्य धरले जात नाही. स्थलांतरित कामगार युईएच्या सोशल इंश्युरन्समध्ये कोणतेही योगदान दिले जात नाही. या देशातील नागरिक मासिक सामाजिक सुरक्षा पेन्शनमध्ये 12.5 टक्के नोकरांच्या मूळ पगार आणि महागाई ( खासगी क्षेत्रातील कर्मचारी) आणि15 टक्के वाटा सरकारी कर्मचा-यांचे वेतन आणि महागाई भत्ता जमा केला जातो. विदेशी बँका आणि तेल कंपन्यांच्या कॅपिटल गेन इनकमवर साधारण व्यावसायिक कर लावला जातो.
2. कतार
कतारच्या स्थानिक कर्मचा-यांसाठी सामाजिक सुरक्षा चार्ज पाच टक्क्यांनी आकारला जातो आणि स्थानिक रहिवाशांकरिता 10 टक्के. परंतु येथे कोणत्याही व्यक्ती आणि कर्मचा-यांवर आयकर,डिव्हिडंड, कॅपिटल गेन्स व संपत्ती आदींच्या हस्तांरणावर कोणतेही कर आकारले जाणार नाही.
पुढे वाचा आणखी काही देशांविषयी.....