आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

करात किंचित वाढ होणार - चिदंबरम

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - अर्थव्यवस्थेला गती देण्यासाठी उत्पादन शुल्क आणि सेवा करात किंचित वाढीचे संकेत सरकारने सोमवारी दिले. संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी पत्रपरिषदेत ही माहिती दिले. या अधिवेशनात महत्त्वाच्या आर्थिक सुधारणांबाबत पावले टाकली जाणार नसल्याचे संकेत त्यांनी दिले. अंतरिम अर्थसंकल्पाचे छोटेखानी भाषण करणार असल्याचे ते म्हणाले.
प्रत्यक्ष करसंहिता (डीटीसी), माल व सेवा कर (जीएसटी) आणि विमा विधेयक या अधिवेशनात पटलावर मांडण्यात येणार नसल्याचे अर्थमंत्र्यांनी स्पष्ट केले. ते म्हणाले, प्राप्तिकर कायदा, ग्राहक कायदा किंवा उत्पादन शुल्क कायद्याच्या दुरुस्तीचा कोणताही प्रस्ताव अधिवेशनात मांडला जाणार नाही.
उत्पादन शुल्क आणि सेवा करात काही किरकोळ बदल केले जातील. विमा क्षेत्रातील थेट विदेशी गुंतवणुकीचे प्रमाण 26 वरून 49 टक्के करण्याचे प्रस्तावित आहे. मात्र विमा विधेयकाला विरोधकांनी विरोध केला आहे. त्यामुळे ते मांडण्यात येणार नाही.
प्राप्तिकर कायदा 1961 या 50 वर्षे जुन्या कायद्याच्या जागी लागू होणारी प्रत्यक्ष करसंहिता (डीटीसी) लागू करण्याबाबत सरकारकडून पाऊल टाकण्यात येणार नाही. फसव्या योजनांना आळा बसावा यासाठी सेबीला जास्तीचे अधिकार देण्याबाबतच्या तरतुदीला या अधिवेशनात प्राधान्य दिले जाईल.